राजस्थान रॉयल्सचा विजयरथ गुजरातवाले रोखणार का? आज होणार RR vs GT सामना

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

RR vs GT Live Streaming l आयपीएल 2024 च्या 24 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. राजस्थान रॉयल्स आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी करत आहे. संघाने आतापर्यंतचे चारही सामने जिंकले आहेत. राजस्थानने त्यांच्या मागील सामन्यात आरसीबीचा 6 गडी राखून पराभव केला होता, तर गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा 33 धावांनी पराभव केला होता. अखेरचा सामना जिंकल्यानंतर दोन्ही संघ आता जयपूरमध्ये आमनेसामने येणार आहेत.

RR vs GT Live Streaming l हेड टू हेड रेकॉर्ड काय आहे?

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात संघाने आतापर्यंत 5 आयपीएल सामने खेळले आहेत. या सामन्यात राजस्थानने केवळ 1 सामना जिंकला आहे. तर गुजरातने 4 सामने जिंकले आहेत. गुजरात टायटन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 188 धावांची आहे. तर राजस्थानविरुद्ध गुजरातची सर्वोच्च धावसंख्या 192 धावा आहे.

राजस्थान आणि बंगळुरू यांच्यातील हा सामना सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी खूपच फायदेशीर आहे. या मैदानावर एकूण 52 आयपीएल सामने खेळले गेले, ज्यामध्ये यजमान संघाने 33 सामने जिंकले आणि विरुद्ध संघाने 19 सामने जिंकले आहेत.

दोन्ही संघाचे संभाव्य खेळाडू :

राजस्थान रॉयल्सचे संभाव्य 11 खेळाडू : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), आर पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, एन बर्जर, आवेश खान, युझवेंद्र चहल.

गुजरात टायटन्सचे संभाव्य 11 खेळाडू शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, केन विल्यमसन, बीआर शरथ, विजय शंकर, दर्शन नळकांडे, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद.

News Title : RR vs GT Live Streaming

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! फक्त मोदींसाठी राज ठाकरेंचा भाजपला बिनशर्त पाठिंबा

“माझ्या घरात अडीच महिने लाईट नव्हती”, तेजस्विनी पंडितने सांगितला धक्कादायक किस्सा

मी कोणाच्या हाताखाली काम करणार नाही, मी मनसेचाच अध्यक्ष राहणार- राज ठाकरे

दिल्लीत नेमकं काय झालं?; राज ठाकरे यांचा सर्वात मोठा खुलासा

‘…त्या काय मतदारांच्या डायपर बदलणार आहेत का?’; राज ठाकरे भडकले