“माझ्या घरात अडीच महिने लाईट नव्हती”, तेजस्विनी पंडितने सांगितला धक्कादायक किस्सा

Tejaswini Pandit | सामान्य लोकांना चित्रपटातलं आयुष्य हे फार सोपं वाटतं. आपल्याच आयुष्यामध्ये संघर्ष असतो असं अनेकांना वाटतं. मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करणारे अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या आयुष्यामध्ये असे अनेक धक्कादायक किस्से घडलेले असतात. त्याचा तुम्ही आम्ही विचार देखील करू शकत नाही. असाच एक किस्सा मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं (Tejaswini Pandit) सांगितला आहे.

तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आपल्या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल माध्यमांवर अनेक माध्यमं तिची मुलाखत घेताना दिसतात. त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत ती नेहमी भरभरून बोलत असते. ती तिच्या वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असते. आता देखील तिनं आपल्या आयुष्यात घडलेला धक्कादायक किस्सा एका मुलाखतीत बोलताना शेअर केला आहे.

कलाकारांची झगमगती दुनिया आपल्याला पाहायला फार आवडते. मात्र त्या झगमगत्या दुनियेमागे कलाकारांचा संघर्ष, त्यांचा संयम आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील जडणघडणीत त्यांनी अनेक गोष्टींचा सामना केलेला असतो. त्यामुळे सामान्य प्रेक्षक त्यांच्या झगमगत्या दुनियेला पाहून भाळतात. तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) असाच एक किस्सा सांगितला आहे. ज्यामुळे तो किस्सा सांगत असताना तिचे डोळे पाणावले होते.

तेजस्विनी पंडितनं सांगितला किस्सा

तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) आपल्या संघर्षाच्या काळातील एक किस्सा सांगितला होता. “घरामध्ये अडीच महिने लाईट नव्हती. लाईट बिल भरायला पैसे नव्हते यामुळे लाईट कापून नेली होती. तो काळ माझ्यासाठी प्रचंड खडतर होता. त्यावेळी मी एक जाहीरात केली होती. तेव्हा मला त्या जाहीरातीचे पैसे आले. मी आधी लाईट बिल भरलं आणि लाईट आली. ज्या दिवशी लाईट आली तेव्हा मी घराचं बिल भरलं होतं. तेव्हा मी प्रचंड आनंदी होते. समाधानी झाले,” असं तेजस्विनी पंडित म्हणाली.

“एका अभिनेत्रीच्या घरामध्ये लाईट नसली की लोकं तुमच्याकडं कसं बघतात. हे मी तुम्हाला शब्दांमध्ये सांगू शकत नाही”, असं तेजस्विनीने एका मुलाखतीमध्ये बोलत असताना आपल्या आयुष्यातील वाईट अनुभव शेअर केला होता. हा अनुभव सांगत असताना तेजस्विनी पंडितचे डोळे पाणावले.

“तेव्हा वाटलं की आपण फार मॅच्युअर झालोत”

“हा प्रसंग घडला तेव्हा माझं फारसं वय नव्हतं पण लाईट आल्यानंतर मला वाटलं की आपण फार मॅच्युअर झालोत. खडतर पाऊल उचलण्यासाठी आपण पहिलं पाऊल उचलल्याचं मला बरं वाटलं. त्यानंतर मी मागे पाहिलं नाही”, असं तेजस्विनी पंडित म्हणाली.

News Title – Tejaswini Pandit Share Her Incidence In Interview

महत्त्वाच्या बातम्या

गुढीपाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ का खातात?, जाणून घ्या कारण

यंदाच्या चैत्र नवरात्रीसाठी ‘हे’ आहेत नऊ रंग; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

“येणाऱ्या निवडणुकीत पवार आडनावाला मत द्या”, अजित पवार यांचं आवाहन

काँग्रेसला समजूतदारपणा नडणार का?; ‘या’ दोन नेत्यांनी टेंशन वाढवलं

पुणे हादरलं! समोस्यांमध्ये गुटखा, तंबाखू, कंडोम भरलं, कारण ऐकून बसेल धक्का