Sangli Lok Sabha | आगामी लोकसभा निवडणूक आता फार लांब राहिली नाही. निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तशा राजकीय घडामोडींना वेग येतोय. राज्याचं राजकारण एका वेगळ्या वळणावर जातंय. सांगलीच्या जागेवरून (Sangli Lok Sabha) महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होताना दिसतेय. गेले काही दिवस उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. अनेक दिवसांपासून सांगली येथे स्थानिक काँग्रेस नेते हे ठाकरेंविरोधात भूमिका घेण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसमधून विशाल पाटील यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी हवी होती. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. आज गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सांगलीची जागा ही ठाकरे गटाकडेच राहिलं असं निश्चित झालं आणि सांगलीतील काँग्रेसचे स्थानिक नेते नॉट रिचेबल झाले आहेत. यामुळे सांगलीच्या (Sangli Lok Sabha) जागेवर आणखी अडचण होण्याची शक्यता आहे.
सांगलीत राजकीय खलबतं
सांगली येथे काँग्रेसचे मतदार अधिक आहे. मात्र याठिकाणी उद्धव ठाकरे यांनी दावा केल्यानं सांगलीतील काँग्रेस नेते विश्वास पाटील वेगळी वाट धरण्याच्या प्रयत्नात आहेत. आता विश्वास पाटील हे नॉट रिचेबल लागत आहेत. त्यानंतर विश्वास पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. सांगलीच्या जागेवरून सांगलीच्या काँग्रेस नेत्यांनी बैठक बोलावली. (Sangli Lok Sabha)
सांगली येथे उद्या काँग्रेसची बैठक होणार आहे. विशाल पाटील, विश्वजीत कदम, विक्रम सावंत, जयश्री पाटील आणि पृथ्वीराज या प्रमुख नेत्यांनी उद्या बैठक बोलवलीय. या बैठकीला मोठा निर्णय घेतला जाणार आहे. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेनंतर पुढील निर्णय़ घेतला जाणार असल्याचं सांगली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलं आहे. ही बैठक उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे.
सांगली येथे उद्या सकाळी बैठक होणार आहे. सांगलीतील सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते उपस्थित राहतील. दरम्यान, सांगलीच्या जागेवरून कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केलीये. विशाल पाटील प्रेमी कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. सध्या त्या पोस्टची चर्चा सगळीकडे सुरू आहे.
पोस्ट चर्चेत
विशाल पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत. ‘आमचं काय चुकलं, आता लढायचं, जनतेच्या कोर्टात’, अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आलीये. दरम्यान काही दिवसांआधी काँग्रेस नेते विश्वजीत पाटील आणि विशाल पाटील हे दिल्लीला मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भेटीला गेले होते. त्याठिकाणी त्यांना सांगलीची जागा मिळण्याबाबत चर्चा कोली होती. मात्र शेवटी सांगलीची जागा ही शिवसेना उद्धव ठाकरे यांना गेली असल्याची माहिती समोर आलीये.
News Title – Sangli Lok Sabha in Vishwas Patil Not Reachable
महत्त्वाच्या बातम्या
मुलगी आराध्याबदल ऐश्वर्या रायने केलं मोठं विधान!, सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल
काँग्रेसला मोठा धक्का; आणखी एक बडा नेता शिंदे गटात!
सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीने घेतला मोठा निर्णय!
‘अशा’ मुली प्रेमाच्या बाबतीत खूप लकी असतात; जीवनात यांना सर्वकाही सहज मिळून जातं
एकनाथ खडसेंना धक्का!, एकनाथ शिंदेंच्या पाठिराख्याने वाढवल्या अडचणी