सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीने घेतला मोठा निर्णय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sangli Lok Sabha | महाविकास आघाडीची नुकतीच पत्रकार परिषद झाली. शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते संजय राऊत उपस्थित होते. यावेळी राऊत यांनी काँग्रेसला मिळालेल्या उमेदवारांची यादी वाचून दाखवली. काँग्रेस पक्षाला एकूण 17 जागा देण्यात आल्या असून त्या जागांवर उमेदवार लढणार आहेत. यामध्ये सांगलीच्या (Sangli Lok Sabha) जागेवरून अनेक दिवसांपासून राजकीय नाट्य सुरू होतं.

गेल्या काही दिवसांआधी उद्धव ठाकरे यांनी घटक पक्षाला विश्वासात न घेता सांगलीच्या (Sangli Lok Sabha) जागेवर दावा केला. उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या (Sangli Lok Sabha) जागेवर उमेदवारी जाहीर केली. यावरून गेल्या काही दिवसांआधी महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वाद झाला. मात्र आता तो वाद निवळला आहे, असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही.

सांगलीच्या जागेवरून काँग्रेसचं नाराजी नाट्य

ठाकरे गटाने सांगलीच्या (Sangli Lok Sabha) जागेवर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली. त्यावेळी वातावरण चांगलंच तापलं होतं. सांगलीमध्ये काँग्रेस पक्षाची अधिक ताकद असल्याचं बोललं जातंय. प्रत्यक्षात सांगली येथील ग्राऊंड लेव्हलवर काँग्रेस दावेदार आहे. सांगलीत काँग्रेसचे मतदार अधिक असून काँग्रेसनं सांगलीच्या जागेवर दावा केला होता. मात्र सांगलीच्या जागेवर चंद्रहार पाटील यांची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

सांगलीच्या जागाप्रकरणावर काँग्रेस हायकमांडची बैठक संजय राऊत यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. तसेच नुकतेच संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर होते. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी झाल्या. दरम्यान आता सांगलीच्या लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकीय नाट्य समाप्त झालं आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही.

सांगलीची जागा कोणाकडे?

सांगली लोकसभा मतदारसंघ हा उद्धव ठाकरे यांना मिळाला आहे. या जागेवर चंद्रहार पाटील निवडणूक लढणार आहेत. मात्र एक गोष्ट अशी आहे की, या जागेवर निवडणूक लढवताना स्थानिक काँग्रेस नेते चंद्रहार पाटील यांना मदत करतील का? हे पाहणं गरजेचं आहे.

सांगली जिल्ह्यातून सध्या काँग्रेसचे संजय पाटील हे खासदार आहेत. दोन्ही वेळा संजय पाटील हे खासदार झाले. त्यानंतर आता मोदींना पराभूत करणं हेच लक्ष आहे. असा महविकास आघाडीनं निर्धार केलाय. मात्र स्थानिक पातळीवरील काँग्रेसमुळे महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे.

News Title – Sangli Lok Sabha Election Final Result

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! अखेर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर, पाहा संपूर्ण यादी

मोठी बातमी! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना महत्त्वाचा इशारा

गोविंदा पाठोपाठ संजय दत्तही राजकारणात कमबॅक करणार?, मोठी माहिती समोर

टोयोटा कंपनीने ग्राहकांसाठी दिली आनंदाची बातमी

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; या विभागात तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु