मोठी बातमी! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना महत्त्वाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | राज्यात सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. कुठे उष्णतेच्या लाटा तर, कुठे जोरदार पावसाच्या धारा असं वातावरण राज्यात दिसून येत आहे. आज (9 एप्रिल) गुढीपाढव्याच्या म्हणजेच हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. विदर्भात जवळपास 4 जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 kmph वेगाने येण्याची शक्यता आहे.

‘या’ भागांत वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

आज नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ या अकरा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.तसंच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी या चार जिल्ह्यांमध्येदेखील वादळी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात (Weather Update) पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात वादळी वारे, वीजांचा कडकडाटासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

मुंबई-पुणे तापमान कसं राहील?

आज पुण्यात (Weather Update pune ) आकाश अंशत: ढगाळ राहील. 10 तारखेला दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. यादरम्यान हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आकाश निरभ्र राहणार आहे.

तर,मुंबई शहर व उपनगरांमध्ये पुढील 24 तास हवामान कोरडं राहणार आहे. तर कमाल तापमान 34 डिग्री अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे. राज्यात सोलापूर जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून सर्वाधिक तापमानाची नोंद सोलापूर जिल्ह्यात झाली आहे.

News Title-Weather Update Vidarbha and Marathwada

महत्त्वाच्या बातम्या-

सर जडेजाने केला नवा विक्रम; हा पराक्रम आजपर्यंत कोणालाही करता आला नाही

शिखर धवनची पलटण कमिन्सच्या शिलेदारांना रोखणार का?

गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका; अन्यथा कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल

या दोन राशींच्या लोकांना व्यवसायाला यश मिळेल

ऐश्वर्याचा घटस्फोट होणार!, 18 वर्षांचं नातं तोडण्यासाठी दोघे कोर्टात