ऐश्वर्याचा घटस्फोट होणार!, 18 वर्षांचं नातं तोडण्यासाठी दोघे कोर्टात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aishwarya | गेल्या काही दिवसांपासून अभिनेता धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनिकांत या दोघांच्या नात्याबदल जोरदार चर्चा रंगल्या होत्या. दोघांच्या नात्यामध्ये सर्व काही ठिक नाही असं चित्र पहायला मिळालं. एवढंच नाहीतर, या दोघांबाबत घटस्फोटाच्या चर्चा देखील सुरु होत्या. दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडपे म्हणून ऐश्वर्या रजनीकांत आणि धनुष यांनी 2022 मध्ये विभक्त होत असल्याची घोषणा केली. मतभेद होत असल्यामुळे दोघांनी विभक्त होत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

काय आहे प्रकण?

2022 मध्ये या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुन्हा एकत्र राहू असा विचार त्यांनी केला, दरम्यान, दोघांमधील मतभेद वाढत गेल्याने त्यांनी आता पुन्हा घटस्फोेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऐश्वर्या (Aishwarya) आणि धनुषने कलम 13 ब अंतर्गत सहमतीने घटस्फोटाची याचिका दाखल केलीये.

दोघांच्या सहमतीने घटस्फोट घेणं असं कलम 13 चा अर्थ आहे. आता या दोघांच्याही याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. त्या दोघांनी 2022 मध्येच त्यांच्या नात्यातील दुराव्याविषयी सांगितलं. त्यानंतर दोघेही अनेकदा त्यांच्या मुलांच्या शाळेतील कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते.

पोस्ट व्हायरल-

दरम्यान, धनुषने 2022मध्ये X अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने म्हटलं होतं की, 18 वर्षे मित्र, जोडपे, पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून एकत्र राहिले. हा प्रवास समजूतदारपणाचा होता. आज आम्ही त्या ठिकाणी उभे आहोत जिथे आमचे मार्ग वेगळे झाले आहेत. ऐश्वर्या (Aishwarya) आणि मी एक जोडपे म्हणून वेगळे होण्याचे ठरवले आहे आणि एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वेळ काढला आहे.”

ऐश्वर्याने केलेली पोस्ट-

ऐश्वर्यानेही अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. शिवाय त्यांच्या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहनही या जोडीने केले होते. दरम्यान धनुष-ऐश्वर्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी 2004 साली शाही विवाहसोहळा केला होता. त्यावेळी त्यांचे वय अनुक्रमे 21 आणि 23 वर्षे होते.

News Title : Aishwarya to get divorce after 18 years

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर ड्रेसिंगरूममध्ये रोहितसोबत घडलं असं काही की…

लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘मला ऑफर दिली, पण…’; राजू शेट्टींचा मोठा गौप्यस्फोट

बीफ बद्दलचं कंगनाचं जुनं ट्विट व्हायरल, लोकांनी केलं ट्रोल, आता म्हणाली ‘कट्टर हिंदू…’

पुण्यात धक्कादायक घटना, MPSC करणाऱ्या मुलीने आयुष्य संपवलं, पोलिसांना मात्र वेगळाच संशय!