पुण्यात धक्कादायक घटना, MPSC करणाऱ्या मुलीने आयुष्य संपवलं, पोलिसांना मात्र वेगळाच संशय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | विद्येचं माहेर घर असलेल्या पुण्यात अनेक विद्यार्थी तसेच तरुण आणि तरुणी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. अनेक राज्यातील तरुण तरुणी पुण्यात शिक्षण घेत येथेच कायमचं स्थायिक होण्याचे स्वप्न पाहत असतात. तर पुण्याच्या नावजलेल्या पेठ्यांमध्ये स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात राहतात.  अशात पुण्यात एक धक्कादायक घटना घडलीये.

काय आहे प्रकरण?

पुण्याच्या (Pune News) गुरुवार पेठेत घडलेल्या प्रकारामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. माध्यामांकडून मिळाल्या माहितीनूसार, अभिलाषा मित्तल ही तरुणी मूळची वाशिमची असून पुण्यातील गुरुवार पेठ येथे स्पर्धा परिक्षेसाठी तयारी करत होती. दरम्यान खोलीमध्ये अभिलाषा ही एकटीच होती.

अभिलाषाने खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि गळफास लावून आत्महत्या केली. नंतर मैत्रिणीने दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला, पण आतून कुठलाच आवाज येत नव्हता. नंतर खिडकीतून पाहिले असता अभिलाषाने आत्महत्या केल्याचं दिसलं. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पुढे काय घडलं?

घडलेल्या प्रकारानंतर पोलिसांनी धाव घेतली असता तपासात या तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचं समोर आलं. त्यामुळे अभिलाषाची हत्या आहे का? आत्महत्या? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी (Pune News) अभिलाषाच्या नातेवाईकांची आणि मैत्रिणींची चौकशी केलीये.

पुण्यात नेमकं चाललंय काय?

गुरुवार पेठ येथे घडलेल्या प्रकरणानंतर अवतीभोवती भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अभिलाषा ही मुळची वाशिमची असून पुण्यातील गुरुवार पेठेत ती मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहत होती. धक्कादायकबाब म्हणजे, अभिलाषा गेल्याच महिन्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आली होती.

News Title : pune news mpsc girl suicide in girl hostel

महत्त्वाच्या बातम्या-

पत्नी बनवायची रिल्स, रिल्सखालच्या कमेंट वाचून पतीनं घेतला हादरुन टाकणारा निर्णय

चेन्नई कोलकाताचा विजयी रथ रोखणार?, आजच्या सामन्यात कोण मारणार बाजी?

मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर रोहितची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

“तुम्ही वय काढू नका, तुम्ही अजून…”, पवारांनी विरोधकांना सुनावलं

अबब! सोनं 71 हजार पार, दरवाढीचे तोडले रेकॉर्ड; जाणून घ्या आजचे दर