‘महायुतीत अपमान झाला’; रामदास आठवलेंच्या वक्तव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ramdas Athawale | आगामी लोकसभा निवडणुकीमुळे देशासह राज्याचं वातावरण चांगलंच तापलं आहे. सर्वच पक्षात जागावाटपवरून चर्चा सुरू आहेत. तर, कुठे नाराज झालेल्या नेत्यांची मनधरणी सुरू आहे. अशातच रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महायुतीबाबत मोठा खुलासा केला आहे.

महायुतीमधील तीन पक्षांमध्ये जागावाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी माझ्याकडून शिकायला हवं, यामुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जात आहे, असं आठवले म्हणाले आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सीट न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

“महायुतीत माझा अपमान..”

‘माझा महायुतीत अपमान झाला तरी मी मोदीजींच्या विचारासोबत आहे.’, असं आठवले म्हणाले. यावेळी त्यांनी मागितलेल्या जागा मिळाले नसल्याचं म्हणत नाराजी देखील जाहीर केली. ‘मी शिर्डीची जागा मागितली होती पण मला ती जागा मिळाली नाही. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी विरोध केला. जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा मी नेहमी त्यांना पाठिंबा दिला. पण, आता ते विरोध करत आहे. आता मी त्यांच्या मुलासाठी प्रचार करणार नाही’, असं आठवले (Ramdas Athawale ) यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं आहे.

2009 मध्ये मी शिर्डी येथे पराभूत झालो होतो. ही सीट मी मागितली होती. जनतेची इच्छा आहे की, मी तिथे यावं. पण, राधाकृष्ण विखे यांनी माझ्या नावाचा विरोध केला. त्यांनी असं का केलं ते मला माहित नाही. नगर जिल्ह्यात मी पहिल्यांदा उभा राहिलो तेव्हा माझा पराभव झाला. विखे मोठे नेते आहेत, पण त्यांनी माझा विरोध करणं चुकीचं आहे,  अशी नाराजी आठवले यांनी व्यक्त केली.

“फडणवीसांनी पुढाकार घेतला असता तर..”

मी लोकसभेसाठी मोदी-शहा यांच्याशी संपर्क साधला होता. मला एक सीट द्यायला हवी होती. शिर्डी नाही तर दुसरी सीट मला द्यायला पाहिजे होती. महाराष्ट्रात फडणवीस यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. त्यांनी थोडा प्रयत्न केला असता तर मला ही सीट नक्कीच मिळाली असती. फडणवीस यांनी चर्चा करून अनेक समस्या सोडवल्या आहेत. त्यांनी मला आणि विखे पाटील यांना बोलवून चर्चा केली असती तर नक्कीच काहीतरी मार्ग निघाला असता, असं आठवले (Ramdas Athawale ) म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली. ‘प्रकाश आंबेडकर यांचा अपमान महाविकास आघाडीने केला आहे. मी अमरावतीत आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देत आहे. पण तिथे मी त्यांच्या प्रचाराला जाणार नाही. मी नवनीत राणा यांच्यासाठी प्रचार करेन. महायुतीमधील स्थिती पाहून मला वाटत नाही की राज ठाकरे हे युतीत येतील.’, असा दावाच यावेळी आठवले यांनी केला.

News title –  Ramdas Athawale big revelation

महत्त्वाच्या बातम्या-

“सुप्रिया सुळे माझा दादा माझा दादा म्हणायच्या तेव्हा खूप राग यायचा”

अर्धशतक हुकलं तरीही रोहितने मोडला धोनीचा विक्रम!

बहुप्रतीक्षित ‘पुष्पा: द रूल’चा टीजर रिलीज; अल्लू अर्जुनच्या हटके लुकने वेधलं लक्ष

सलमान खान राजकारणात करणार प्रवेश?; ‘या’ बड्या नेत्याने घेतली भेट

भाजपत प्रवेश करताच खडसेंना मिळणार मोठं गिफ्ट?