“सुप्रिया सुळे माझा दादा माझा दादा म्हणायच्या तेव्हा खूप राग यायचा”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Jitendra Awhad | लोकसभा निवडणूक तोंडावर असताना प्रत्येक मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते जात सभा घेत आहेत. त्यावेळी आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राज्यातच नाहीतर देशातील सर्वात महत्त्वाचा आणि लक्षवेधी असणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. मात्र आता नणंद आणि भावजय लढणार यावर शिक्कामोर्तब झाला. दोन्ही गटातून जोरदार प्रचार सुरू आहे. आता पुन्हा एकदा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित दादांना बहिण भावाच्या नात्यावरून डिवचलंय. तर सुप्रिया सुळे यांनी भाजपसोबत गेलेल्यांना शुभेच्छा म्हणत टोला लगावला आहे.

अनेक दिवसांपासून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जात मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत. अजित पवार यांनी देखील याआधी अनेकदा बारामतीमध्ये सभा घेतल्या आणि आपले काका शरद पवार यांच्यावर टीका केली होती. लोकसभा निवडणूक जवळ आलीये. यापार्श्वभूमीवर एका सभेतून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाऊ-बहिणीच्या नात्यावरून पुन्हा अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

“बहिणीचं प्रेम समजायला हृदय लागतं”

एका सभेमध्ये जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे या बहिण भावाच्या नात्यावर भाष्य केलं. “माझा दादा माझा दादा अशा सुप्रिया सुळे म्हणायच्या. त्यावेळी आम्हाला एवढा राग यायचा, एवढा राग यायचा पण आता शांत झाला. हे प्रेम बहिणीचं होतं. हे प्रेम आपलेपणाचं होतं. हे प्रेम घर तुटलंय म्हणून होतं. हे प्रेम समजायला हृदय लागतं,” असं म्हणत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार यांना सुनावलं आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील भाष्य केलं.

“रिश्ते निभाणा आसान है पर…”

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आव्हाड साहेब माझ्यावर तुटून पडले. त्यांना माझं सांगणं आहे. ‘रिश्ते निभाणा आसान है पर रिश्ते निभाणा उसी के लिए ताकद लगती है !’, ‘रिश्ते जोडना मैं जाणती हू तोडना नही सिखाया.’ जे आपापल्या वाटेने गेले त्यांना माझ्या शुभेच्छा. प्रत्येकाची काही कारणं असतील”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काही दिवसांआधी अजित पवार यांनी सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी पवार कुटुंब हे माझ्याविरोधात आहेत पण माझ्यासोबत मतदार आहेत. मतदारांनी मला साथ द्यावी अशी भावनिक साद अजित पवार यांनी मतदारांना घातली होती.

दरम्यान, आव्हाड यांनी देखील अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नात्यावर बोलत असताना भावनिक होऊन “बहिणीचं प्रेम समजायला हृदय लागतं”, असं म्हणत आव्हाड यांनी अजित दादांवर निशाणा साधला.

News title – Jitendra Awhad Aggressive On Ajit pawar About Sister Brother Relation

महत्त्वाच्या बातम्या

हार्दिक पांड्याला महादेव पावला, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मिळालं मोठं यश

आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांची पुण्यातून सर्वात मोठी घोषणा!

मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना गंभीर इशारा!

‘त्याने जबरदस्तीने माझ्या ब्रेस्टवर…’; अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा

‘…त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’; शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाण