हार्दिक पांड्याला महादेव पावला, दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मिळालं मोठं यश

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधार पद दिल्यानं पांड्याविरोधात चाहत्यांनी संताप व्यक्त केला होता. मुंबई इंडियन्स संघ पांड्याच्या नेतृत्वामध्ये सलग तिन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाला. यामुळे पांड्याला अनेक चाहत्यांनी ट्रोल केलं. सोशल मीडिया म्हणू नका की मैदान. पांड्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मुंबईचा तिसरा सामना हा राजस्थान रॉयल्सविरूद्ध 1 एप्रिल रोजी झाला. यानंतर पांड्याने सोमनाथ मंदिरात जाऊन भगवान महादेवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर पांड्याचा आयपीएल 2024 (IPL 2024) मधला पहिलाच विजय आहे. पांड्याला महादेव पावले आहेत असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. (IPL 2024)

पांड्याला महादेव पावले

गेली तीन सामने पांड्याच्या नेतृत्वात यश मिळत नव्हते. तिन्ही सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर काही दिवसांआधी पांड्या सोमनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला. त्यानं दर्शन घेतलं आणि पांड्याच्या नेतृत्वामध्ये मुंबई इंडियन्स संघाला पहिला विजय मिळाला. दिल्ली विरूद्ध मुंबई इंडियन्स हा विजय मिळवला. यावेळी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघाला 235 धावांचं आव्हान दिलं होतं. (IPL 2024)

Hardik Pandya

मुंबई इंडियन्सने अखेरच्या पाच ओव्हरमध्ये दमदार खेळी करत 96 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने आपल्या होम ग्राऊंड वानखेडे स्टेडियमवर नवा विक्रम रचला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वानखेडेवर रोहितनं महेंद्र सिंहचा धोनीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (IPL 2024)

मुंबई इंडियन्सची दमदार खेळी

दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्विकारली. मुंबईला पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी चालून आली. याचा मुंबई इंडियन्स संघाने चांगला फायदा घेतला. सुरूवातीला इशान किशन आणि रोहित शर्माने 80 धावांची पार्टनरशिप केली. रोहितने 27 चेंडूंमध्ये 49 धावा केल्या. त्याने 3 षटकार आणि 6 चौकार मारत अफलातून कामगिरी केली. त्यानंतर मुंबईला सलग तीन धक्के मिळाले.

सूर्यकुमार यादवचा हा यंदाच्या आयपीएलमधील पहिलाच सामना होता. मात्र तो जसा मैदानात आला तसाच तो मैदानातून बाहेर गेला. सेट फलंदाज इशान किशनने चांगली कामगिरी केली. त्याने 23 चेंडूंमध्ये 42 धावा केल्या आणि बाद झाला. त्यानंतर तिलक वर्माने अवघ्या 6 धावा केल्या आणि बाद झाला. टीम डेव्हिड आणि पांड्याने डावाला सावरलं. त्यांनी 60 धावा केल्या. पांड्या 33 चेंडूंमध्ये 39 धावा करून बाद झाला. रोमरिया शेफर्ड आणि टीम डेव्हिडने दिल्लीच्या गोलंदाजांची पिसं काढली. रोमरियाने अखेरच्या षटकामध्ये 4,6,6,6,4,6 खेळी करत 32 धावा चोपल्या.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झाये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.

 News Title – IPL 2024 In God Bless Hardik Pandya

महत्त्वाच्या बातम्या

आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांची पुण्यातून सर्वात मोठी घोषणा!

मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांना गंभीर इशारा!

‘त्याने जबरदस्तीने माझ्या ब्रेस्टवर…’; अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा

‘…त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’; शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

“फडणवीसांना विनोद तावडे यांनी चितपट केलंय”