‘…त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’; शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | बारामती लोकसभा मतदारसंघात पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मेळाव्याला शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपस्थिती लावली. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांची देखील उपस्थित होती. यावेळी शरद पवारांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दोन पक्ष फोडून आल्याचं सांगितलं, ते त्यांचं कर्तृत्व सांगत आहे. पक्ष फोडले म्हणणाऱ्यांना पक्षातील हजारो नाहीतर लाखोंच्या संख्येनं चिवट शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना योग्य जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असं शरद पवारांनी म्हटलंय.

“दमदाटीला बळी पडणारी ही औलाद नाही”

खऱ्या अर्थानं आपणं माणसं एकत्र जोडण्याचं काम करतो, त्यांच्याबद्दल आदर दाखवतो. पण यांनी पक्ष फोडले. तरी कार्यकर्ते मजबुतीने उभे आहेत. काही जण दमदाटी करीत आहे, असं पवार म्हणाले.

काही जण दमदाटी करत आहेत, पण त्यांना माहीत नसेल की, दमदाटीला बळी पडणारी ही औलाद नाही. आज बारामतीकडे सुदैवाने देशाचं लक्ष आहे. आपण नक्की जास्त जागा जिंकू, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय.

काही लोकांनी व्यक्तिगत हल्ले सुरू केले आहेत. पण पक्ष फोडणाऱ्यांना लाखो कार्यकर्ते आणि शिवसैनिक योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही महाराष्ट्रमध्ये नेतृत्व करू, असं शरद पवार म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री कुणाला करायचं याची चर्चा सुरू होती, त्यावेळी उद्धव ठाकरे माझ्या शेजारी बसले होते, मी त्यांचा हात धरला आणि वर केला. त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, ही माझी भूमिका होती, त्यांना रस नव्हता. कोरोना काळात त्यांनी चांगलं काम केलं. तब्येत ठिक नसतानाही उद्धव ठाकरेंनी 17-18 तास काम केलं, असं सांगत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“फडणवीसांना विनोद तावडे यांनी चितपट केलंय”

आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांची पुण्यातून सर्वात मोठी घोषणा!

बच्चू कडूंची नवी खेळी; महायुतीला मोठा धक्का

माढा लोकसभेसाठी शरद पवार?; महत्त्वाची माहिती आली समोर

आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर, प्रकाश आंबेडकर होकार देणार का?