आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर, प्रकाश आंबेडकर होकार देणार का?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Prakash Ambedkar | महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात जागावाटपाचा तिढा सुटला नाही. पर्यायाने प्रकाश आंबेडकारांनी लोकसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. आंबेडकर स्वतंत्र लढल्याचा सर्वात मोठा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून (Congress)  प्रकाश आंबेडकर यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. आता प्रकाश आंबेडकर यांना नवी ऑफर देण्यात आली आहे.

काय आहे काँग्रेसची नवी ऑफर?

काँग्रेस पक्षाने प्रकाश आंबेडकर यांची मनधरणी सुरु करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं होतं. आम्ही अजूनही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करायला तयार असून, तुम्हाला पाहिजे त्या जागा द्यायला तयार आहोत, असं नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं.

नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर आता काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांना नवीन ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासोबत बोलणी करायला आजही काँग्रेस तयार आहे. प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेत पाठवायला आणि केंद्रात मंत्रिपद द्यायला आम्ही तयार आहोत, मात्र प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून माघार घ्यावी, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं आणि तसा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते अनिस अहमद (Anis Ahmed) यांनी दिली आहे.

नेमकं काय म्हणाले अनिस अहमद?

काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे, त्याचाच एक भाग म्हणून त्यांना राज्यसभा आणि मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर आमचे मोठे भाऊ आहेत, त्यांना राज्यसभेत पाठवण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय. ते त्या प्रस्तावाचा स्वीकार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं अहमद यांनी म्हटलंय.

प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे भाजपला फायदा झाला आहे. 2019 साली आंबेडकरांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्याचा फायदा झाला नाही. दोन्ही मतदारसंघातून ते पराभूत झाले. यावेळी सुद्धा प्रकाश आंबेडकर निवडून येण्याची शक्यता नाही, त्यांच्यामुळे भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे, असं अनिस अहमद यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीवर चांगलेच नाराज आहेत. आधी बैठकींना आमंत्रण नव्हतं तर नंतर जागावाटपात योग्य वाटा मिळत नसल्याची त्यांची तक्रार होती. काँग्रेसच्या नव्या ऑफरला प्रकाश आंबेडकर कसा प्रतिसाद देतात?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

News Title: congress new offer for prakash ambedkar

महत्त्वाच्या बातम्या-

अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून शिक्षकाला बेदम मारहाण!

13 वर्षांच्या मुलीच्या प्रसंगावधानाने आनंद महिंद्रा झाले चकित; थेट दिली नोकरीची ऑफर

मोठी बातमी! ‘हा’ बडा नेता भाजपात घरवापसी करणार?

गुढीपाडव्याला बनवा स्वादिष्ट आम्रखंड, जाणून घ्या खास रेसिपी

प्रीति झिंटा पंजाबच्या ‘या’ खेळाडूच्या पडलीय प्रेमात, खास पोस्ट करुन म्हणाली…