मोठी बातमी! ‘हा’ बडा नेता भाजपात घरवापसी करणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bjp | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राजकीय नाट्य घडतंय. एकनाथ खडसेंनी रावेर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी नाकारली. यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांची मुलगी रोहिणी खडसे यांना शरद पवार गटातून रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. एकनाथ खडसे (Eknath Khadase) हे भाजपत जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. मात्र रोहिणी खडसे देखील ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपली भूमिका बदलतील का?, यावर प्रश्नचिन्ह आहे.

एकनाथ खडसे (Eknath Khadase) आता शरद पवार गटामध्ये आहेत. मात्र एकनाथ खडसे (Eknath Khadase) लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याची बातमी समोर आली आहे. केंद्रीय गहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर ते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करतील. मात्र रोहिणी खडसे यांची भूमिका काय असणार आहे? यावर त्यांनी आपल्या ट्वीटद्वारे माहिती दिली आहे.

रोहिणी खडसे यांची भूमिका

रोहिणी खडसे या शरद पवार गटामध्येच असणार आहेत. याबाबत त्यांनी ट्वीट करत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासोबतच राहू, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. महिला परिषदेचं अध्यक्षपद रोहिणी खडसे यांच्याकडे आहे.

रोहिणी खडसे यांचं ट्वीट जसंच्या तसं

“मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच … लढ़ेंगे और जीतेंगे”, असं ट्वीट करत त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.


एकनाथ खडसे भाजपमध्ये कधी प्रवेश करतील याबाबत चर्चा होती. मात्र आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग त्यांना मोकळा झाला आहे. मात्र रोहिणी खडसे या शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच खडसे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश कधी होईल याबाबत माहिती देखील समोर आली.

एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येत्या 8 किंवा 9 तारखेला भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत माहिती दिली आहे.

News Title – Eknath Khadase Joined BJP And What About Rohini Khadase

महत्त्वाच्या बातम्या

प्रीति झिंटा पंजाबच्या ‘या’ खेळाडूच्या पडलीय प्रेमात, खास पोस्ट करुन म्हणाली…

भाजपविरोधात शिंदेंच्या शिवसेनेत मोठी खदखद, एकनाथ शिंदेंच्या बैठकीत हायहोल्टेज ड्रामा

देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतल्याने मंगलदास बांदल यांना नारळ, वंचितनं केली मोठी घोषणा!

रखरखत्या उन्हात ‘ही’ पेय प्या, फक्त थंडावाच नाही तर मिळेल भरपूर एनर्जी

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!