भाजपविरोधात शिंदेंच्या शिवसेनेत मोठी खदखद, एकनाथ शिंदेंच्या बैठकीत हायहोल्टेज ड्रामा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या (Shivsena) आमदार-खासदार तसेच कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मोठा हायहोल्टेज ड्रामा पहायला मिळाला. भाजपविरोधात (BJP) शिवसेना नेत्यांनी आपली खदखद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे व्यक्त केली. नाराज शिवसेना नेत्यांचा चांगलाच सामना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करावा लागला, त्यामुळे या बैठकीची आता राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरु आहे.

बेठकीत नेमकं काय झालं?-

महायुतीमध्ये शिवसेनेला मिळत असलेल्या वागणुकीबद्दल तसेच जागावाटपाबद्दल शिवसेना नेत्यांनी (Shivsena Leaders) नाराजी व्यक्त केली. आपण धाडस करुन उठाव केला, त्यामुळे मित्रपक्षाला सत्तेची फळं चाखता आली, मात्र आता आपल्या सन्मानाची वागणूक मिळत नाही, अशी खदखद अनेक शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यापुढे बोलून दाखवली.

परभणी, उस्मानाबाद हे आपले हक्काचे मतदारसंघ आणि मित्रपक्षांना दिले. रायगड, शिरुर हे सुद्धा आपल्या हक्काचे मतदारसंघ असताना ते मित्रपक्षांना देऊन आपण युतीचा धर्म पाळला. एकिकडे आपण युतीधर्म पाळत असताना दुसरीकडे मित्रपक्षाकडून मात्र युतीधर्माचं पालन होत नसल्याचं दिसत आहे, असं शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिलं.

हे मतदारसंघ अजिबात सोडू नयेत!

मुख्यमंत्र्यांसोबतच्या (CM Eknath Shinde) बैठकीत शिवसेना नेत्यांनी मतदारसंघ भाजपला सोडण्याबद्दल जोरदार आक्षेप घेतला. परभणी, उस्मानाबाद, रायगड, शिरुर हे मतदारसंघ सोडले असले तरी ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग तसेच संभाजीनगर आता कुठल्याही परिस्थितीत मित्रपक्षांना सोडू नये, अशी मागणी शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली, तसेच पालघर मतदारसंघ सुद्धा मित्रपक्षांना देऊ नये, अशी मागणी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी काढली समजूत!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांची खदखद ऐकून घेतली तसेच त्यांना योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. युतीमध्ये तडजोड करावी लागते, ज्या खासदारांना तिकीट मिळालं नाही त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

भाजप मोठा भाऊ आहे, आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं आहे. त्यामुळे भाजपने एक-दोन जागा जास्त लढवल्या तर फरक पडत नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे.

News Title: Eknath shinde meeting with shivsena leaders

महत्त्वाच्या बातम्या:

देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतल्याने मंगलदास बांदल यांना नारळ, वंचितनं केली मोठी घोषणा!

रखरखत्या उन्हात ‘ही’ पेय प्या, फक्त थंडावाच नाही तर मिळेल भरपूर एनर्जी

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

कंगनाने सुभाषचंद्र बोस यांना म्हटलं देशाचे प्रथम पंतप्रधान; सोशल मीडियावर झाली ट्रोल

‘या’ राशीच्या लोकांची अडकलेली कामे पूर्ण होतील, वाचा राशीभविष्य