रखरखत्या उन्हात ‘ही’ पेय प्या, फक्त थंडावाच नाही तर मिळेल भरपूर एनर्जी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Drinks for Heatwave | एप्रिल महिन्यात तापमानात प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत तर राज्यात उष्णतेची लाट येणार आहे. तापमान वाढत असल्याने घराबाहेर पडणं देखील अवघड झालं आहे. या काळात उष्माघात होण्याचीही अधिक शक्यता असते. त्यामुळे शरीराला थंड ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात.

बरेच लोक अशा काळात घातक असलेले कोल्ड्रिंक्सचे सेवन करतात. पण, यामुळे शरीर आतून थंड होत नाही, तर शरीरातील उष्णता  अजून वाढत जाते. त्यामुळे उन्हात भरपूर एनर्जी देतील, असे पेय पिले पाहिजे. या लेखात तुम्हाला याबाबतच सविस्तर माहिती दिली आहे. उष्माघातापासून ही देसी पेय तुमचा बचाव करू शकतात.

शरीराला हायड्रेट ठेवणारी पेय

लिंबूपाणी : व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबू पाणी उन्हाळ्यात खूप फायदेशीर ठरते. ताजे राहण्यासाठी आणि उन्हाळ्यात एनर्जीसाठी लिंबूपाणी प्यायला पाहिजे. तसेच उन्हाळ्यात हृदयरोग, मधुमेह, कर्करोग आणि लठ्ठपणा यासारख्या आरोग्य समस्यांपासूनही संरक्षण मिळते. संशोधनानुसार, दररोज लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास, मानसिक आरोग्य, पाचक आरोग्य आणि ऊर्जा पातळी राखण्यास मदत होते.

उसाचा रस : उन्हाळ्यात ठिकठिकाणी रसवंती गृह दिसून येतात. उसाचा रस शरीराला लगेच थंड करण्यास मदत करते. त्यात ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीराला थंड ठेवण्यास मदत करतात आणि दिवसभर ऊर्जा देतात. इतकंच नाही तर साखरेपेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे ते मधुमेहींसाठीही सुरक्षित आहे.

ताक : ताक हे उन्हाळ्यात सर्वोत्तम पेय (Drinks for Heatwave )मानले जाते कारण ते संपूर्ण हंगामात शरीराला हायड्रेट ठेवते. ताक हे कॅल्शियमने समृद्ध असलेले दुग्धजन्य पदार्थ आहे, जे आपली हाडे मजबूत ठेवते. त्यात पाणी, लैक्टोज, केसिन आणि लैक्टिक ऍसिड देखील असते. यामुळे आतड्यात खराब बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध होतो. याचे सेवन केल्यास उन्हाळ्यात डिहायड्रेशन होत नाही.

नारळ पाणी : नारळ पाणी पिण्याचा उन्हाळ्यातील सर्वांत मोठा फायदा म्हणजे यामुळे शरीर दीर्घकाळ हायड्रेट राहते. नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात. यामुळे अशक्तपणा आणि चक्कर यासारख्या समस्या दूर होतात.

टरबूजाचा रस: टरबूज (Drinks for Heatwave ) या रसाळ फळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ते तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. त्यात लाइकोपीन आणि अँटिऑक्सिडेंट असते, ज्यामुळे सूर्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण होते. यासोबतच शरीर थंड राहते.

जलजीरा : हे मसालेदार पेय जिरे, पुदिन्याची पाने आणि चिंचेपासून बनवले जाते. यामुळे शरीर थंड होण्यास मदत होते. यामुळे पचनक्रिया देखील चांगली राहते. त्यामुळे उन्हाळ्यात जलजीरा पिला जातो.

News Title : Drinks for Heatwave

महत्वाच्या बातम्या-

‘या’ राशीच्या लोकांची अडकलेली कामे पूर्ण होतील, वाचा राशीभविष्य

आयपीएलमधून भारतीय संघाला मिळणार ‘हे’ 3 नवीन सुपरस्टार

रामनवमीपूर्वी राम मंदिर ट्रस्टने भाविकांना दिला मोठा धक्का!

पोटाची चरबी कमी करायची असल्यास दररोज सकाळी हे 4 उपाय करा

अभिनेता रणबीर कपूरने खरेदी केली Bentley Continental GT कार; किंमत एकूण व्हाल थक्क