देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतल्याने मंगलदास बांदल यांना नारळ, वंचितनं केली मोठी घोषणा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | शिरुर लोकसभा (Shirur Loksabha) मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना उमेदवारी दिली होती. मात्र मंगलदास बांदल यांचं नाव जाहीर होताच हे नाव चांगलंच वादात सापडलं होतं. त्यांच नाव जाहीर होण्याआधी ते पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारात उतरले होते, तसेच त्यांच्यावर अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत. भाजप बी टीम असल्याचा आरोप यामुळे वंचित बहुजन आघाडीवर (Vanchit Bahujan Aaghadi) होऊ लागला होता, त्यातच एक धक्कादायक घटना उजेडात आल्यानं वंचितनं अखेर मोठा निर्णय घेतला आहे.

वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती,  मात्र आता या ठिकाणी दुसरा उमेदवार देण्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीने केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर (Rekhatai Thakur) यांच्या सूचनेनुसार ही उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. वंचितचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद यासंदर्भातील घोषणा केली आहे.

का रद्द केली बांदल यांची उमेदवारी?

मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांची उमेदवारी जाहीर होताच वादात सापडली होती. वंचितनं वेगळं लढण्याची घोषणा केल्यानंतर यामुळे भाजपला अप्रत्यक्षपणे मदत होऊ शकते, अशी टीका होत होती. त्यात मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीने तेल ओतण्याचं काम केलं. मंगलदास बांदल यांनी याआधी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्यांचे आणि भाजपचे संबंध यानंतर उजेडात येऊ लागले होते. वंचितवर यामुळे टीका सुद्धा होऊ लागली होती.

दरम्यान, इंदापुरात (Indapur) मंगलदास बांदल यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis Mangaldas Bandal Meet) यांची भेट घेतल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्यांच्या भेटीचे फोटो सुद्धा जोरदार व्हायरल झाले होते. माध्यमांमध्ये संदर्भातील बातम्या आल्यानंतर वंचितने यासंदर्भात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द केली.

वंचितनं आपल्या निर्णयात काय म्हटलं?

मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करताना वंचितनं यासंदर्भातील कारण सुद्धा स्पष्ट केलं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha) वंचितने खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पाठिंबा दिलेला आहे. याच मतदारसंघात येणाऱ्या इंदापुरात मंगलदास बांदल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे पक्षाच्या निर्णयाविरुद्ध गेल्याचा ठपका मंगलदास बांदल यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

वंचितनं आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?

News Title: Pune News Shirur loksabha Mangaldar bandal

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!

कंगनाने सुभाषचंद्र बोस यांना म्हटलं देशाचे प्रथम पंतप्रधान; सोशल मीडियावर झाली ट्रोल

‘या’ राशीच्या लोकांची अडकलेली कामे पूर्ण होतील, वाचा राशीभविष्य

आयपीएलमधून भारतीय संघाला मिळणार ‘हे’ 3 नवीन सुपरस्टार

रामनवमीपूर्वी राम मंदिर ट्रस्टने भाविकांना दिला मोठा धक्का!