आयपीएलमधून भारतीय संघाला मिळणार ‘हे’ 3 नवीन सुपरस्टार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 l आतापर्यंत इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमधून असे अनेक क्रिकेटपटू उदयास आले आहेत, ज्यांनी क्रिकेटच्या खेळात भारताचे वर्चस्व गाजवले आहे. प्रत्येक मोसमात असे काही क्रिकेटपटू नक्कीच पाहायला मिळतात ज्यांचे भविष्य खूप उज्ज्वल दिसते. यावेळीही असे अनेक खेळाडू दिसत आहेत ज्यांचे भविष्य अतिशय उज्ज्वल मानले जात आहे. पण आम्ही तुम्हाला अशा तीन खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, जे भविष्यात भारतासाठी खेळणार हे जवळपास निश्चित आहे.

अभिषेक शर्मा :

यंदाच्या मोसमात सनरायझर्स हैदराबादकडून टॉप ऑर्डरमध्ये खेळणाऱ्या अभिषेक शर्माने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले आहे. अभिषेकने आतापर्यंत 4 सामन्यात 217.56 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने 161 धावा केल्या आहेत. चेन्नईविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात अभिषेकने 12 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 37 धावांची शानदार खेळी केली होती.

IPL 2024 l रियान पराग :

राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या रियान परागने या मोसमात जोरदार पुनरागमन केले आहे. रियान गेल्या काही वर्षांत जवळपास फ्लॉप झाला होता, त्यानंतर त्याला खूप टीकेला सामोरे जावे लागले होते. पण आयपीएल 2024 मध्ये टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत आहे. तो सतत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे.

मयंक यादव :

लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना वेगवान गोलंदाज मयंक यादवने आपले वेगळेपण निर्माण केले आहे. मयंक हा असा गोलंदाज आहे जो ताशी 150 किमी पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत असतो. त्याने ताशी 156.7 किमी वेगाने सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे. मयंकने केवळ त्याच्या वेगानेच नव्हे तर त्याच्या कर्तृत्वाने देखील प्रभावित केले आहे.

News Title – IPL 2024 Abhishek Sharma, Mayank Yadav, Riyan Parag Best Players

महत्त्वाच्या बातम्या – 

रामनवमीपूर्वी राम मंदिर ट्रस्टने भाविकांना दिला मोठा धक्का!

पोटाची चरबी कमी करायची असल्यास दररोज सकाळी हे 4 उपाय करा

अभिनेता रणबीर कपूरने खरेदी केली Bentley Continental GT कार; किंमत एकूण व्हाल थक्क

हार्दिक पांड्या एकटा पडणार, इतक्या खेळाडूंसह रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार?

सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त?, जाणून घ्या आजचे इंधन दर