हार्दिक पांड्या एकटा पडणार, इतक्या खेळाडूंसह रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma | यंदाचा आयपीएल 2024 हंगाम अनेक कारणाने चर्चेत आला. आयपीएल सुरू होण्याआधी हार्दिक पांड्याला कर्णधार पद देण्यात आलं. रोहित शर्माचं (Rohit Sharma) कर्णधार पद काढल्याने मुंबई इंडियन्सचे चाहते संतापले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामध्ये संघ म्हणावी अशी कामगिरी करताना दिसत नाही. यामुळे आता क्रिकेटविश्वातून महत्त्वाची माहिती समोर येतेय. रोहित शर्माचं कर्णधारपद काढल्यानंतर आता पुन्हा नीता अंबानी यांनी रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदाची ऑफऱ दिली. मात्र रोहितने (Rohit Sharma) ती ऑफऱ धुडकावली. तो पुढील वर्षी संघ सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स हा संघ सोडणार असल्याची चिन्हे आहेत. सध्या रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यामध्ये संघाप्रती एकमत नसल्याचं पाहायला मिळतंय. रोहित शर्मानं पुढील वर्षी मुंबई इंडियन्स संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. यासोबत इतरही खेळाडू संघातून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहेत. मात्र याबाबत अद्यापही अधिकृत माहिती समोर आली नाही.

कोणकोण संघ सोडू शकतात?

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघ सोडून जाणार असल्याची चर्चा आहे. त्यासह इतर मुंबई इंडियन्सचे दोन दिग्गज खेळाडू संघ सोडण्याच्या वाटेवर आहेत. रोहित शर्मासह जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे संघ सोडणार असल्याची चर्चा आहे. रोहित शर्माने 2011 मध्ये मुंबई इंडियन्स संघामध्ये खेळण्यास सुरूवात केली. रोहित गेली 14 वर्षे आयपीएल खेळत आहे. जसप्रीत बुमराह गेली 12 वर्षांपासून आयपीएल खेळत आहे. तर सूर्यकुमार हा गेली 9 वर्षांपासून खेळत आहे. यामुळे हे दिग्गज दुसऱ्या संघामध्ये जाण्याची शक्यता आहे.

रोहित शर्माची नवी खेळी?

रोहितने आयपीएलमध्ये 1 शतक आणि 34 अर्धशतकीय खेळी खेळलीय. मुंबईने 201 सामन्यांमध्ये 5,110 धावा केल्यात. तर यंदाच्या आयपीएल 2024 हंगामात रोहितने 3 सामन्यांमध्ये 69 धावा केल्या आहेत.

रोहित शर्माचे कर्णधार पद काढल्याने चाहते सोशल मीडियावर तसेच मैदानात पांड्याविरोधात घोषणा देताना दिसतात. तिन्ही सामन्यांमध्ये पांड्याच्या नेतृत्वामध्ये म्हणावं असं संघानं प्रदर्शन केलं नाही. पांड्याच्या नेतृत्वात पराभवाची हॅटट्रिक झाली. यामुळे चाहते मैदानामध्ये पांड्याला सतत डिवचताना दिसतात.

News Title – Rohit Sharma With Two Legendary Player Will Leave Mumbai Indians Team

महत्त्वाच्या बातम्या

‘रामायण’च्या स्टारकास्टचा लूक व्हायरल; ‘हा’ अभिनेता दिसणार राजा दशरथच्या भूमिकेत

लग्न कधी करणार?; पूजा भट्टने अखेर उत्तर दिलं

शरद पवार गटाचा ‘हा’ उमेदवार संकटात; उमदेवारी जाहीर होताच मोठी कारवाई

मनोज जरांगे पाटलांचं एक पाऊल पुढे; केली ‘ही’ मोठी घोषणा

सलग पराभवानंतर हार्दिक पांड्या पोहोचला महादेवाच्या चरणी; मंदिरात केली पूजा