‘रामायण’मध्ये दिसणार ‘हे’ कलाकार?; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ramayana | दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण’ (Ramayana) चित्रपटाचं शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे. प्रभू श्रीराम, माता सीता, हनुमान आणि रावण यांची भूमिका कोण साकारणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या सेटचा फोटो, व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता चित्रपटातील कलाकारांचा लूक व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर सध्या ‘रामायण’च्या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. या फोटो आणि व्हिडीओमध्ये लारा दत्ता, अरुण गोविल आणि शीबा चढ्ढा यांचा ऑनस्क्रिन लूक रिव्हील झाला आहे. छोट्या पडद्यावर राम म्हणून लोकप्रिय असणारे अभिनेते अरुण गोविल यांचा चित्रपटात महत्त्वाचा रोल असणार आहे.

स्टारकास्टचा लूक व्हायरल

अरुण गोविल हे राजा दशरथच्या भूमिकेत (Ramayana) दिसणार आहेत. त्यांचा सेटवरील लूक व्हायरल झाला आहे. तर, अभिनेत्री लारा दत्ता ही कैकयीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, शिबा चढ्ढा मंथाराची भूमिका साकारणार आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोची आता चर्चा रंगली आहे.

या चित्रपटासाठी तब्बल 11 कोटी रुपये फक्त सेटवरच खर्च करण्यात आल्याची माहिती आहे. लीक झालेल्या या व्हिडीओमध्ये सेटचीही झलक दिसून येत आहे. पौराणिक चित्रपटाच्या अनुषंगाने हा सेट तयार करण्यात आल्याचं दिसून येतंय. सेटवरच इतके पैसे खर्च केलेत म्हटल्यावर प्रेक्षकांची आतुरता अजूनच वाढली आहे.

‘रामायण’मध्ये हे कलाकार दिसणार

या चित्रपटात अभिनेता सनी देओल हनुमानाची भूमिका करणार आहे. तर श्रीराम यांची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरचं नाव फिक्स करण्यात आलं आहे. तर, साऊथचा अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात विभीषणाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय अभिनेता यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. रकुल प्रीत सिंह शूपर्णखाची भूमिका साकारेल.

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला होता. आता या चित्रपटकडून (Ramayana) चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. नितेश तिवारी ‘रामायण’ तीन भागात प्रदर्शित करणार असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

News Title- Ramayana movie cast Look viral

महत्त्वाच्या बातम्या –

उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘एडवेंचर ट्रीप’ प्लॅन करताय?; इथे मिळेल बेस्ट पॅकेज तेही बजेटमध्ये

रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये राडा!, उदय सामंतांनी वाढवलं राणेंचं टेन्शन

चेन्नई सुपर किंग्ज घरच मैदान गाजवण्यास सज्ज? हैदराबादच्या संघाशी होणार लढत

या राशींच्या व्यक्तींनी कौटुंबिक वादात पडू नका

पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सला दिला घरचा आहेर; गिलची खेळी ठरली व्यर्थ