उन्हाळ्याच्या सुट्टीत ‘एडवेंचर ट्रीप’ प्लॅन करताय?; इथे मिळेल बेस्ट पॅकेज तेही बजेटमध्ये

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IRCTC Tour Plan : उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रत्येक जण कुठेतरी बाहेर जाऊन फिरण्याचा, मज्जा-मस्ती करण्याचा प्लॅन करत असतात. पण, चांगली ठिकाणे आणि पॅकेज शोधण्यात खूप अडचणी येतात. या लेखात तुम्हाला काही बेस्ट आणि बजेटमधील समर टुर प्लॅनबाबत माहिती देण्यात आली आहे. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

या पॅकेजमधून प्रवास करणे फायदेशीर आहे, कारण यामध्ये तुम्हाला एकाच वेळी अनेक ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळते. यासाठी तुम्हाला फक्त टूर पॅकेज बुक करावं लागेल, त्यानंतर प्रवासाची संपूर्ण तयारी भारतीय रेल्वेकडून केली जाईल.

लडाख/लेह टूर पॅकेज

यामध्ये (IRCTC Tour Plan) तुम्हाला 6 रात्री 7 दिवसांचे टूर पॅकेज मिळेल. हे पॅकेज 27 एप्रिलपासून सुरू होत आहे.या पॅकेजसाठी प्रति व्यक्ती 52,400 रुपये फिस आहे. तुम्हाला फक्त 52,400 रुपयांमध्ये कॅम्पमध्ये राहण्याची संधी मिळेल. या पॅकेजमध्ये हॉटेल, फ्लाइट तिकीट, जेवण आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा खर्च समाविष्ट आहे. हा प्लॅन अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर https://www.irctctourism.com भेट देऊ शकता.

गुलमर्ग,पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगर

भारतातील स्वर्ग पाहायचं असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी खूप खास ठरेल. येत्या 20 एप्रिलपासून चंदीगड येथून हा प्लॅन सुरू होत आहे. हे टूर पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांचे आहे. यामध्ये गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगरला एकत्र भेट देण्याची संधी मिळेल. तीन लोकांसोबत प्रवास करत असल्यास तुम्हाला प्रति व्यक्ती 30,800 रुपये भरावे लागतील.

30,800 रुपयांमध्ये तुम्हाला फेरीचे तिकीट, पाच दिवसांचा नाश्ता आणि डिनर तसंच एक रात्र हाऊस बोटमध्ये घालवण्याची संधी मिळेल. हॉटेलचा खर्चही पॅकेजमध्येच येणार आहे. हा प्लॅन तुम्ही नक्कीच करू शकता. यासाठी विलंब करू नका. आत्ताच आपले तिकीट बुक करा.

मनाली आणि शिमला टूर पॅकेज

चंदीगडमधून (IRCTC Tour Plan) तुम्ही दररोज हे पॅकेज बुक करू शकता.यात आठवड्याचा समावेश आहे. तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज फिस 24, 115 रुपये आहे. यात तुम्हाला राउंड ट्रिप तिकीट, नाश्ता आणि डिनर तसंच हॉटेलचा खर्च समाविष्ट आहे.

कनेची टूर पॅकेज

हे पॅकेज तर तुमच्या मुलांसाठी खूपच भारी ठरेल. कारण, यात तुम्ही रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, बर्मा ब्रिज, रोप वॉकिंग, रिंग वॉक, ट्रॅम्पोलिन आणि झिप लाइनचा आनंद घेऊ शकता.यासोबतच लक्झरी टेंटमध्ये रात्रीचे जेवण, नाश्ता, दुपारचे जेवण यासोबतच सकाळ व संध्याकाळ चहा आणि प्रेक्षणीय स्थळी बसची सोयदेखील यात समाविष्ट आहे.

News Title :  IRCTC Tour Plan For Summer
महत्वाच्या बातम्या-

धमाकेदार फीचर्ससह Skoda Superb पुन्हा मैदान गाजवण्यास सज्ज; जाणून घ्या किंमत

आज गुजरात टायटन्स पंजाब किंग्ससोबत भिडणार; कोण वर्चस्व गाजवणार

शाहरुखच्या टीमने दिल्लीवाल्यांना केलं पराभूत

कन्या आणि तूळ राशीसह या 3 राशींच्या व्यक्तींसाठी राजकीय दृष्ट्या चांगला दिवस

‘सगळे पुरस्कार ऐश्वर्यालाच….’; ‘या’ अभिनेत्याचा मोठा खुलासा