धमाकेदार फीचर्ससह Skoda Superb पुन्हा मैदान गाजवण्यास सज्ज; जाणून घ्या किंमत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Skoda Superb Re-launched in India l कित्येक दिवसांपासून ग्राहक Skoda Superb ब्रँडच्या दुसऱ्या मॉडेलची वाट पाहत होते. अशातच आता या ब्रँडचे भारतात दुसरे जनरेशन मॉडेल लाँच केले आहे. मात्र Skoda Superb ने बाजारात फक्त 100 युनिट्स लाँच केल्या आहेत. ही सर्व 100 युनिट्स भारतात आयात करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी एप्रिलमध्येच Skoda Superb ने भारतीय बाजारपेठेत हे मॉडेल बंद केले होते. आता वर्षभरानंतर स्कोडाने हे मॉडेल भारतात पुन्हा लाँच केले आहे.

2024 Skoda Superb ची वैशिष्ट्ये :

2024 मध्ये स्कोडा सुपर्बचा L&K व्हेरियंट भारतीय बाजारात लाँच करण्यात आला होता. त्याची काही फीचर्स 2024 मध्ये लाँच केलेल्या मॉडेलमध्ये अपडेट केली गेली आहेत. 2024 Skoda Superb मध्ये डायनॅमिक चेसिस कंट्रोल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच ॲक्टिव्ह टायर मॉनिटरिंग प्रेशर सिस्टीम आणि सुरक्षेसाठी 9 एअरबॅग देखील वाहनात देण्यात आल्या आहेत. Skoda Superb च्या नवीन मॉडेलमध्ये 9-इंचाची Columbus infotainment system आहे, जी 2023 च्या मॉडेलमध्ये देखील नव्हती.

2024 मध्ये Skoda Superb चे पुन्हा लाँच केलेले मॉडेल तीन बाह्य पेंट शेड्ससह भारतीय बाजारपेठेत दाखल झाले आहे. रोसो ब्रुनेलो, वॉटर वर्ल्ड ग्रीन आणि मॅजिक ब्लॅक हे तीन कलर व्हेरिएंट या मॉडेलमध्ये लोकांसाठी देण्यात आले आहेत. तसेच या वाहनात 18-इंच अलॉय व्हील देखील आहेत.

Skoda Superb Re-launched in India l 2024 स्कोडा सुपर्बची पॉवरट्रेन :

2024 Skoda Superb BS6 फेज II-अनुरूप 2.0-लिटर, 4-सिलेंडर टर्बो पेट्रोल पॉवर प्लांटसह सुसज्ज आहे, जे 190 HP पॉवर आणि 320 Nm टॉर्क जनरेट करते. या पुन्हा लाँच केलेल्या कारचे इंजिन आधीच्या मॉडेलप्रमाणेच आहे. त्याच्या पॉवरट्रेनमध्ये 7-स्पीड DSG ऑटोमॅटिक गियर बॉक्स देखील आहेत.

याशिवाय Skoda ने 2023 साली बंद केलेले मॉडेल पुन्हा एकदा परत आणले आहे. पण यावेळी कंपनीने Skoda Superb च्या किमतीत वाढ केली आहे. री-लाँच केलेल्या Skoda Superb ची एक्स-शोरूम किंमत 54 लाख रुपये आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत 16.71 लाख रुपये जास्त आहे.

News Title : Skoda Superb Re-launched in India

महत्त्वाच्या बातम्या-

आज गुजरात टायटन्स पंजाब किंग्ससोबत भिडणार; कोण वर्चस्व गाजवणार

शाहरुखच्या टीमने दिल्लीवाल्यांना केलं पराभूत

कन्या आणि तूळ राशीसह या 3 राशींच्या व्यक्तींसाठी राजकीय दृष्ट्या चांगला दिवस

‘सगळे पुरस्कार ऐश्वर्यालाच….’; ‘या’ अभिनेत्याचा मोठा खुलासा

भाजपचा दबाव?; शिंदे गटाने शेवटच्या क्षणी उमेदवार बदलला