PPF खातेधारकांनो ‘या’ गोष्टीकडे लक्ष द्या, अन्यथा होऊ शकते लाखोंचे नुकसान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PPF Scheme Interest Rate l तुम्हीही PPF खात्यात गुंतवणूक केली असेल, तर तुमच्यासाठी ही उपयुक्त बातमी आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी 5 एप्रिल ही तारीख खूप महत्त्वाची आहे. 5 एप्रिलपर्यंत गुंतवणूक केल्यास लाखोंचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत जर तुम्ही एकरकमी पैसे जमा करत असाल तर 5 तारखेपूर्वी तुम्ही 1.5 लाख रुपये जमा कराल याची विशेष काळजी घ्या.

PPF खातेधारकांनो ही गोष्ट लक्ष घ्या :

PPF खातेधारकाने 15 एप्रिल रोजी PPF खात्यात पैसे जमा केले असतील तर PPF खात्याच्या नियमांनुसार त्याचे मासिक व्याज 5 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान सर्वात कमी शिल्लक रकमेवर मोजले जाईल. 15 एप्रिल रोजी जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला एप्रिल महिन्यात व्याजाचा लाभ मिळणार नाही.

पीपीएफ खातेधारकाने जर 5 एप्रिलनंतर पैसे जमा केले तर त्याला 15.84 लाख रुपये व्याज मिळेल. त्यामुळे, 5 एप्रिलनंतर एकरकमी गुंतवणूक केल्यास PPF खातेधारकाला 15 वर्षांच्या कालावधीत 2.69 लाख रुपयांचे नुकसान होईल.

PPF Scheme Interest Rate l सध्या PPF वर मिळतेय इतके टक्के व्याज :

सध्या PPF मध्ये 7.1 टक्के दराने व्याज दिले जात आहे. महिन्याच्या 5 तारखेपासून ते महिन्याच्या शेवटच्या तारखेदरम्यान जी काही किमान शिल्लक राहते, त्याच महिन्यात त्यावर व्याज जोडले जाते. तुम्ही 5 तारखेनंतर जे पैसे जमा कराल त्यावर तुम्हाला पुढील महिन्यापासून व्याज मिळेल.

PPF कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही या आर्थिक वर्षात 5 एप्रिलपर्यंत एकरकमी 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली आणि ही गुंतवणूक 15 वर्षे सुरू ठेवली, तर तुम्हाला 15 वर्षांत जमा केलेल्या रकमेवर एकूण 18.18 लाख रुपये व्याज मिळेल. त्याचवेळी जर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेनंतर पीपीएफमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला फक्त 17.95 लाख रुपये व्याज मिळेल. अशास्थितीत तुम्हाला 15 वर्षांत 23,188 रुपयांचे व्याजाचे नुकसान होईल.

News Title : PPF Scheme Interest Rate

महत्त्वाच्या बातम्या-

धमाकेदार फीचर्ससह Skoda Superb पुन्हा मैदान गाजवण्यास सज्ज; जाणून घ्या किंमत

आज गुजरात टायटन्स पंजाब किंग्ससोबत भिडणार; कोण वर्चस्व गाजवणार

शाहरुखच्या टीमने दिल्लीवाल्यांना केलं पराभूत

कन्या आणि तूळ राशीसह या 3 राशींच्या व्यक्तींसाठी राजकीय दृष्ट्या चांगला दिवस

‘सगळे पुरस्कार ऐश्वर्यालाच….’; ‘या’ अभिनेत्याचा मोठा खुलासा