आज गुजरात टायटन्स पंजाब किंग्ससोबत भिडणार; कोण वर्चस्व गाजवणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

GT vs PBKS Pitch Report l आयपीएल 2024 चा 17 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. गेल्या दोन्ही सामन्यात पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली पंजाब विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अशातच दुसरीकडे गुजरातने आपल्या घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सने विजय मिळवला आहे. अशातच आजचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवला जाणार आहे.

GT vs PBKS Pitch Report l अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजांसाठी योग्य :

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स आणि शिखर धवनच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी योग्य मानली जाते.

अहमदाबादमधील या मैदानावर आतापर्यंत आयपीएलमधील एकूण 29 सामने झाले आहेत. यापैकी १४ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्याचबरोबर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने 15 सामन्यात मैदानावर मजल मारली आहे. म्हणजे या मैदानावर नाणेफेक काही विशेष भूमिका बजावत नाही. या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या गुजरात टायटन्सच्या नावावर आहे. गुजरातने मुंबईविरुद्ध 233 धावा केल्या होत्या.

GT vs PBKS दोन्ही संघाचे संभाव्य शिलेदार :

पंजाब किंग्ज संघ : शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम कुरान, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वथ कावेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंग, शशांक सिंग, तनय थियागराजन, प्रिन्स चौधरी आणि रिले रुसो.

गुजरात टायटन्स संघ : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, रॉबिन मिन्झ, केन विल्यमसन, अभिनव मंधार, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, जयंत यादव, राहुल तेवतिया. , कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, साई किशोर, उमेश यादव, रशीद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा आणि मानव सुथार.

News Title : GT vs PBKS Pitch Report

महत्त्वाच्या बातम्या-

शाहरुखच्या टीमने दिल्लीवाल्यांना केलं पराभूत

कन्या आणि तूळ राशीसह या 3 राशींच्या व्यक्तींसाठी राजकीय दृष्ट्या चांगला दिवस

‘सगळे पुरस्कार ऐश्वर्यालाच….’; ‘या’ अभिनेत्याचा मोठा खुलासा

भाजपचा दबाव?; शिंदे गटाने शेवटच्या क्षणी उमेदवार बदलला

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज!