भाजपचा दबाव?; शिंदे गटाने शेवटच्या क्षणी उमेदवार बदलला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hingoli Lok Sabha | एक मोठी माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. भाजप नेत्यांच्या दबावामुळे हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. (Hingoli Lok Sabha)

बाबुराव कदम कोहळीकर नवे उमेदवार

हिंगोली मतदारसंघाचे (Hingoli Lok Sabha) शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना हिंगोली लोकसभा (Hingoli Lok Sabha) मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याने शिंदे गटाचे नेते आणि शिवसैनिक नाराज असल्याचं समजतंय. भाजप नेत्यांनी याला विरोध केल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी विरोध केला आहे. तर हिंगोली लोकसभेसाठी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

जाहीर केलेली उमेदवारी रद्द

महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीमध्येही जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर गेली काही दिवस बैठकांचे सत्र सुरू आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. हे उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपस्थित होते. मात्र यातून हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. मात्र आज त्यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला.

हेमंत यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपने विरोध केला आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांची उमेदवारी काढून घेण्यात आली आहे. तर नाशिक मतदारसंघात आधी भाजपने दावा केला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं दावा केला. यामुळे हेमंत गोडसे यांची धाकधुक वाढली आहे.

ईडीच्या कचाट्यात सापडलेल्या भावना गवळी यांच्याकडून यवतमाळ-वाशिमच्या उमेदवारीवर प्रयत्न केला जातोय. तर हेमंत गोडसे यांनी लोकसभेचं तिकीट मिळणार असल्याचा त्यांचा समज आहे. पण भावना गवळी तसा दावा करत नाहीत.

भावना गवळीऐवजी संजय राठोड यांना तिकीट दिलं जाईल, अशी माहिती मिळत आहे. मात्र आता भावना गवळी यांच्याऐवजी लोकसभेसाठी राजश्री पाटील यांना तिकीट मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

News Title – Hingoli Lok Sabha In Cancel Hemant Patil Candidancy Of Loksabha Election

महत्त्वाच्या बातम्या

श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार अखेर ठरला!

अनिल परब यांच्या साई रिसॉर्टवर हातोडा, किरीट सोमय्या म्हणाले…

ऐन सणासुदीला सर्वसामान्यांना मोठा झटका!

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये सर्वात मोठा ट्विस्ट!

भाजपशी जवळीक असणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला वंचितची उमेदवारी, वंचितला नावही माहीत नव्हतं?