रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये सर्वात मोठा ट्विस्ट!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघामध्ये नवीन ट्वीस्ट निर्माण झाला आहे. कल्याण, ठाणे, नाशिकप्रमाणे कोकणातील जागेवर मोठा ट्वीस्ट निर्माण झाला. अनेक दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) कोण लढणार यावर प्रश्नचिन्ह होते. किरण सामंत आणि नारायण राणे यांच्यात अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती. मात्र आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघाचा तिढा सुटल्यात जमा आहे.

शिवसेनेचे किरण सामंत यांनी माघार घेणार असल्याचं स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. फेसबुकवर किरण सामंत यांनी पोस्ट केली होती. त्यानंतर ती पोस्ट काढण्यात आली. मात्र सोशल मीडियावर सर्वत्र त्यांची पोस्ट व्हायरल होऊ लागली आहे. यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) नारायण राणे यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मार्ग मोकळा राहिला आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी निवडणूक लढण्यापासून स्वत: माघार घेतली आहे. तर आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे निवडणूक लढवणार आहेत. याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे नारायण राणे यांना राज्यसभेचे तिकीट देण्यात आलं नव्हतं. किरण सामंत यांच्या माघारीमुळे ही जागा भाजपकडे जाणार असल्याची दाट शक्यता आहे.

किरण सामंत यांची पोस्ट

“नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्याकरीता आणि अब की बार 400 पार होण्याकरीता सिंधुदुर्ग मतदारसंघातून किरण सामंत यांची माघार”, अशी पोस्ट किरण सामंत यांनी केली. मात्र नंतर ही पोस्ट त्यांनी डिलीट केली. किरण सांमत यांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ही पोस्ट कायम ठेवली आहे.

कोण आहेत किरण सामंत?

किरण सामंत उर्फ भैय्या सामंत हs बांधकाम व्यवसायामध्ये आहेत. ते उच्चशिक्षित उद्योजक आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत.

News Title – Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Narayan rane Kiran Samant Update

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! वसंत मोरे यांना ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

रवि राणांचा बच्चू कडूंवर पलटवार, थेट डोनाल्ड ट्रम्पशी केली तुलना, म्हणाले…

“रोहित शर्माला पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार करा”

“तो डाव अशोक चव्हाण यांचाच”; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ

निवडणूक काळात WhatsApp मेसेज पाठवताना काळजी घ्या, नाहीतर तुमच्यावर होऊ शकते कारवाई