भाजपशी जवळीक असणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला वंचितची उमेदवारी, वंचितला नावही माहीत नव्हतं?

Pune News | Mangaldas Bandal महाविकास आघाडीसोबत सुरु असलेली जागावाटपाची चर्चा फिस्कटल्याने वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) आपले उमेदवार मैदानात उतरवण्याची घोषणा केली आहे. पुण्यातून मनसेला सोडचिठ्ठी दिलेल्या वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे. तर जाहीर केलेल्या या यादीत दुसरं नाव अत्यंत धक्कादायक आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, मात्र त्यांना उमेदवारी दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

कोण आहेत मंगलदास बांदल?

शिरुर तालुक्यातील शिक्रापूरचे (Shikrapur, Pune) मंगलदास बांदल तसेच पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे (NCP) नेते आहेत, मात्र पक्षविरोधी कारवाया केल्याने अजित पवार (Ajit Pawar) यांची त्यांच्यावर काही वर्षे वक्रदृष्टी निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा मार्ग निवडला होता. 2009 साली त्यांनी भाजपकडून त्यांनी विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती, मात्र त्यांना यश आलं नाही. 2019 साली त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र यावेळी देखील त्यांना यश आलं नाही.

मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांच्याबद्दल वाद होण्याचं कारण म्हणजे त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी. वेगवेगळ्या गुन्ह्यांमुळे तब्बल 2 वर्षे तुरुंगात असलेल्या आणि नुकत्याच जामीनावर बाहेर आलेल्या मंगलदास बांदल यांना वंचितनं उमेदवारी दिली आहे. मंगलदास बांदल यांना 26 मे 2021 साली शिवाजीराव भोसले बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटक झाली होती, त्यानंतर सराफा व्यावसायिकाकडून 50 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंद आहे. याशिवाय रांजणगाव (Ranjangaon), शिक्रापूर (Shikrapur), सणसवाडी (Sanaswadi MIDC) परिसरातील एमआयडीसींमध्ये त्यांच्यावर विविध गुन्ह्यांची नोंद आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये खंडणी आणि अपहरणाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

“भाजपचा माणूस, वंचितचा उमेदवार” याची एकच चर्चा-

महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागावाटपाच्या चर्चा फिस्कटल्या, त्यानंतर वंचितने स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा केली. या परिस्थितीत स्वतंत्र उमेदवार उभे करुन वंचित अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करत असल्याची टीका होऊ लागली होती. मंगलदास बांदल यांच्या रुपाने भाजपचा माणूस वंचितच्या तिकिटावर उभा राहिला असल्याची चर्चा सुरु झाली आहे, आणि त्याला कारण सुद्धा तसंच आहे.

वंचितची उमेदवारी मिळण्याआधी मंगदास बांदल (Mangaldas Bandal) यांनी शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांच्या पक्षप्रवेशाला उपस्थिती लावली होती, त्यानंतर त्यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. त्यानंतर काहीच दिवसात त्यांना वंचितकडून शिरुर लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे या कारणावरुन आता वंचितला टीकेचा सामना करावा लागत आहे. वंचित भाजपची (BJP) बी टीम असल्याची चर्चा आता जोरात सुरु झाली आहे.

पहिल्या यादीच नाव सुद्धा चुकवलं-

धक्कादायक बाब म्हणजे वंचितला मंगलदास बांदल यांचं नाव माहीत नव्हतं का?, असा प्रश्न सुद्धा विचारला जात आहे. कारण वंचितकडून समाज माध्यमांमध्ये पहिल्यांदा जाहीर करण्यात आलेल्या यादीत मंगलदास बांदल यांचं नाव चुकवण्यात आलं होतं. मंगलदास बागुल असं नाव पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलं होतं. नंतर त्यात टायपिंग मिस्टेक असल्याचं स्पष्टीकरण वंचितकडून देण्यात आलं होतं. दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe), राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव आणि वंचितचे मंगलदास बांदल अशी तिरंगी लढत होणार आहे.

 

News Title: pune news mangaldas bandal vanchit candidate for shirur loksabha

महत्त्वाच्या बातम्या-

वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘अशा’ व्यक्ती आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाहीत!

‘कॉफीऐवजी मी माझ्या दिवसाची सुरुवात सेक्सने करेन’; अभिनेत्याच्या वक्तव्याने खळबळ

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा ‘तो’ व्हिडिओ जोरदार व्हायरल!

15 मिनिटांत टॅनिंग निघेल, करा ‘हा’ उपाय