Siddhant Karnick | मनोरंजन विश्वामध्ये दररोज कोणत्या न् कोणत्या घडामोडी घडताना दिसतात. समाज माध्यम आणि टेलिव्हिजन चॅनेल्सवर मोठ्या प्रमाणावर अभिनेते आणि अभिनेत्रींच्या मुलाखती पाहायला मिळतात. कलाकार मंडळी आपल्या आयुष्यावर मुलाखतीच्या माध्यमातून भाष्य करतात. मुलाखतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांवर कलाकार दिलखुलासपणे उत्तरं देतात. आदिपुरूष आणि अॅनिमलसारख्या चित्रपटामध्ये अभिनय केलेला अभिनेता सिद्धांत कर्णिक (Siddhant Karnick) याने एका माध्यमाला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते.
सिद्धांत कर्णिक (Siddhant Karnick) हा बॉलिवूडचा उत्कृष्ट अभिनेता आहे. अॅनिमलसारख्या चित्रपटामध्ये त्यानं रणबीर कपूरच्या बहिणीच्या पतीची भूमिका केली होती. तो याआधी अनेक हिंदी मालिकांमधून घरोघरी पोहोचला आहे. (Siddhant Karnick)
सध्या सिद्धांत कर्णिक (Siddhant Karnick) एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. ‘फिल्मीज्ञान’च्या मुलाखतीत त्याला सकाळी दिवसाची सुरूवात तुम्ही कशी कराल? असा प्रश्न करण्यात आला होता. त्यावर त्यानं असं काही उत्तर दिलं ज्यामुळे सिद्धांत अधिकच प्रकाश झोतात आला आहे. सकाळी उठल्यानंतर एखाद्या कॉफीने सुरूवात करण्यापेक्षा मी माझी सकाळची सुरूवात सेक्सने करेल असं उत्तर त्यानं दिलं.
काय म्हणाला सिद्धांत कर्णिक?
सिद्धांत कर्णिकला मुलाखतीत सकाळची सुरूवात कशी करायला आवडेल असा प्रश्न विचारला त्यावर त्यानं उत्तर दिलं आहे. सिद्धांत म्हणाला की, “मला सकाळी दिवसाची सुरूवात ही कॉफीपेक्षा सेक्सने करायला आवडेल. मग मी नाश्ता तयार करेल. तिचा मसाज करेल. पूर्णवेळ तिला देईल”, असं उत्तर सिद्धांत कर्णिकने दिलं.
“तृप्ती डिमरीला डेट करायला आवडेल”
या मुलाखतीमध्ये सिद्धांतने तृप्ती डिमरीला डेट करायला आवडेल असं सांगितलं आहे. तृप्तीने अॅनिमल चित्रपटात झोया नावाचं पात्र केलं होतं. तसेच सिद्धांतने अॅनिमल व्यतिरिक्त ‘लिसन अमाया’, ‘थप्पड’ आणि ‘आदिपुरुष’, सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
‘एक था राजा एक थी रानी’, ‘ये है आशिकी’, ‘माही वे’सारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. सिद्धांत हा घटस्फोटीत आहे. त्याचा 2016 मध्ये विवाह झाला. त्यानंतर 2020 मध्ये त्यानं आपल्या पत्नीशी घटस्फोट घेतला.
News Title – Siddhant Karnick Say Morning Sex better Than Cofee
महत्त्वाच्या बातम्या
15 मिनिटांत टॅनिंग निघेल, करा ‘हा’ उपाय
पहिल्यांदाच SIP मध्ये गुंतवणूक करताय? तर चुकूनही ‘या’ चुका करू नका
राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा; ‘या’ भागांना बसणार फटका
तिसऱ्या लग्नानंतरही शोएब मलिकने ‘या’ अभिनेत्रीसोबत केले धक्कादायक कृत्य