तिसऱ्या लग्नानंतरही शोएब मलिकने ‘या’ अभिनेत्रीसोबत केले धक्कादायक कृत्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shoaib Malik Sent Flirty Messages To Actress l पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हा कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच चर्चेत असतो. जानेवारी 2024 मध्ये शोएब मलिकने तिसऱ्या लग्नाचे फोटो शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. सानिया मिर्झापासून घटस्फोट घेतल्यानंतर शोएबने प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत तिसरे लग्न केले आहे. तिसऱ्यांदा लग्न केल्यामुळे शोएबलाही खूप ट्रोल करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा क्रिकेटर शोएब मलिक चर्चेत आला आहे.

शोएब मलिकवर अभिनेत्रीने फ्लर्ट केल्याचा केला आरोप :

शोएब मलिकवर तिसऱ्या लग्नानंतरही एका अभिनेत्रीसोबत फ्लर्ट केल्याचा आरोप आहे. पाकिस्तानी अभिनेत्री नवल सईद नुकतीच एका रमजान शोमध्ये खास पाहुणी म्हणून पाकिस्तान येथे पोहोचली होती. यादरम्यान तिला होस्टने विचारले की, तुम्हाला अभिनेत्यांकडून फ्लर्टी मेसेज येतात का? या प्रश्नाच्या उत्तरात अभिनेत्री म्हणाली की, तिला येणारे बहुतांश मेसेज जे क्रिकेटपटूंचे असतात. हे ऐकून लोकांना आश्चर्य वाटले.

तसेच यादरम्यान नवल सईद म्हणाली की, तिला क्रिकेटपटूंकडून मेसेज येत असतात, पण ते योग्य वाटत नाही. ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे त्यांनी योग्य वागले पाहिजे. यानंतर होस्टने तिला विचारले की नसीम शाह हा खेळाडू आहे का? हे ऐकून अभिनेत्री हसायला लागली आणि म्हणाली की, क्रिकेटर सिंगल नाही.

Shoaib Malik Sent Flirty Messages To Actress l नवल सईदच्या शोचा व्हिडिओ होतोय व्हायरल :

जेव्हा होस्ट नादिया खानने तिला थेट विचारले की, तो शोएब मलिक आहे का? यावर नवल काहीच बोलली नाही पण शोएबचे नाव ऐकून तिने हसून प्रश्न टाळला. आता या शोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचवेळी शोएब मलिक नवलला फ्लर्टी मेसेज पाठवत असल्याचे लोकांना वाटत आहे.

नवल सईद ही पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 2017 मध्ये ‘यकिन का सफर’मध्ये तिने छोटी भूमिका साकारली होती. आणि याचबरोबर तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. यानंतर तिने ‘इझाबान’, ‘फरियाद’, ‘सितम’, ‘दिल ए वीरान’, ‘दाग ए दिल’ आणि ‘माह ए तमम’ सारख्या शोमध्ये दमदार अभिनय कौशल्य करून आपला ठसा उमटवला आहे. नवल सध्या ‘जान-ए-जहां’ या शोमध्ये दिसत आहे. या शोमध्ये ती एका विधवेची भूमिका साकारत आहे.

News Title – Shoaib Malik Sent Flirty Messages To Actress Nawal Saeed

महत्त्वाच्या बातम्या-

घर बांधण्याचं स्वप्न महागणार? सिमेंटच्या किंमती ‘तब्बल’ एवढ्या रुपयांनी वाढणार

आयपीएल हंगामात 21 वर्षीय मयंक यादवची हवा, अवघ्या 2 सामन्यात लावले सर्वांना वेड

OnePlus च्या ‘या’ फोनवर मिळतोय तब्बल 6 हजारांचा डिस्काउंट; जाणून घ्या डिटेल्स

आकर्षक फीचर्ससह बजाज कंपनीची Pulsar N250 बाईक लाँच; किंमत किती असणार?

मोठी गुड न्यूज! सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त