आकर्षक फीचर्ससह बजाज कंपनीची Pulsar N250 बाईक लाँच; किंमत किती असणार?

Pulsar N250 Launch Date l आजकाल तरुणांना बाइक्सची प्रचंड क्रेझ आहे. अशातच ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन बाईक लाँच करत असतात. आता बजाज ऑटो कंपनी आपल्या नवीन पल्सरसह बाजारात येण्यासाठी सज्ज आहे. बजाज कंपनीने Pulsar N250 लाँच करण्याची तारीख देखील जाहीर केली आहे. कंपनी 10 एप्रिल 2024 रोजी पल्सरचे हे मॉडेल लाँच करणार आहे.

Pulsar N 250 मध्ये काय खास असणार? :

बजाज ऑटोचे अद्ययावत Pulsar N 250 टेस्ट चाचणी पार पडली. यामध्ये असे दिसून आले की, ही बाईक अप-डाऊन फॉर्क्ससह बाजारात येऊ शकते. या बाईकमध्ये एलसीडी डिस्प्ले देखील असणार आहे. मात्र या फीचर्सची संपूर्ण माहिती मॉडेल लाँच झाल्यानंतर समोर येणार आहे.

पल्सरच्या या अद्ययावत मॉडेलमध्ये पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळू शकतो, ज्याद्वारे बाइक रायडरला गिअरची स्थिती, वेग, आरपीएम, मायलेज आणि इंधन क्षमता याबद्दल माहिती मिळू शकेल. याशिवाय या बाईकमध्ये ब्लूटूथ कन्सोल देखील दिला जाऊ शकतो, ज्याद्वारे रायडर त्याच्या स्मार्टफोनला बाइकशी कनेक्ट करू शकेल.

Pulsar N250 Launch Date l बजाज पल्सर N250 पॉवरट्रेन :

बजाज पल्सरचे नवीन मॉडेल हे पल्सर N250 चे अपडेटेड व्हर्जन असणार आहे. Pulsar N250 मध्ये 249 cc, सिंगल-सिलेंडर, एअर आणि ऑइल कूल्ड 2-व्हॉल्व्ह इंजिन असणार आहे, जे 8,750 rpm वर 24.1 bhp पॉवर आणि 6,500 rpm वर 21.5 Nm टॉर्क निर्माण करण्यास सज्ज आहे. Pulsar N 250 मध्ये 5-स्पीड गियर बॉक्स देखील असणार आहे.

नवीन मॉडेल्सची किंमत सध्याच्या मॉडेल्सपेक्षा थोडी अधिक असणार आहे. बजाज पल्सर 250 ची एक्स-शोरूम किंमत 1.50 लाख रुपये आहे. पल्सरचे नवीन मॉडेल Suzuki Gixxer 250, TVS Apache RTR 200 4V या बाइक्सची स्पर्धा करणार आहे.

News Title – Updated Pulsar N250 Launch Date

महत्वाच्या बातम्या –

मोठी गुड न्यूज! सोनं ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त

पुण्यात गुन्हेगारांचे धाबे दणाणले, पोलीस कोम्बिंग ऑपरेशन करणार!

किंग कोहलीला हरवून केएल राहुलच्या संघाची दणक्यात टॉप-4 मध्ये एंट्री; पाहा संपूर्ण पॉईंट टेबल

कमाईची सुवर्णसंधी; भारती एअरटेल ग्रुपचा IPO आज उघडणार

मोठी बातमी! वसंत मोरे यांना ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर