किंग कोहलीला हरवून केएल राहुलच्या संघाची दणक्यात टॉप-4 मध्ये एंट्री; पाहा संपूर्ण पॉईंट टेबल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 Point Table l आयपीएल 2024 च्या मोसमात काल लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा मोठा पराभव केला आहे. काल झालेला सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सने तब्बल 28 धावांनी विजय मिळवून गुणतालिकेत मोठा बदल केला आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा एलएसजी संघ गुणतालिकेत टॉप-4 मध्ये पोहोचला आहे.

पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स अव्वल :

अशातच IPL 2023 च्या हंगामातील उपविजेता गुजरात टायटन्स चौथ्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे. तर आश्चर्याची बाब म्हणजे तीनही सामने गमावलेला मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे. तसेच यंदाच्या हंगामात आयपीएल 2024 च्या पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ अव्वल स्थानावर कायम आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा RR हा या स्पर्धेतील एकमेव संघ आहे ज्याने तिन्ही सामने जिंकले आहेत.

कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपरजायंट्स, लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स यांनी या T20 लीगमध्ये प्रत्येकी 2 सामने जिंकले आहेत. अशाप्रकारे या चार संघांचे 4-4 गुण समान आहेत. चांगल्या धावगतीच्या आधारावर कोलकाता दुसऱ्या स्थानावर, चेन्नई तिसऱ्या स्थानावर, लखनौ चौथ्या स्थानावर आणि गुजरात पाचव्या स्थानावर आहे.

IPL 2024 Point Table l या हंगामात मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी :

पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांना या स्पर्धेत प्रत्येकी एकच सामना जिंकता आला आहे. सनरायझर्स हैदराबाद हा संघ चांगल्या धावगतीच्या आधाराव सहाव्या क्रमांकावर, दिल्ली सातव्या आणि पंजाब किंग्ज आठव्या क्रमांकावर आहे. तसेच काल झालेल्या सामन्यात लखनौकडून पराभूत झाल्यानंतर बेंगळुरू संघ नवव्या स्थानावर घसरला आहे.

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी झाली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई संघाला या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे गुणतालिकेतही त्याचे खाते उघडले नाही. गुणतालिकेत तो 0 गुणांसह 10 व्या क्रमांकावर आहे.

News Title – IPL 2024 Point Table

महत्त्वाच्या बातम्या

कमाईची सुवर्णसंधी; भारती एअरटेल ग्रुपचा IPO आज उघडणार

मोठी बातमी! वसंत मोरे यांना ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

रवि राणांचा बच्चू कडूंवर पलटवार, थेट डोनाल्ड ट्रम्पशी केली तुलना, म्हणाले…

“रोहित शर्माला पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार करा”

“तो डाव अशोक चव्हाण यांचाच”; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ