रवि राणांचा बच्चू कडूंवर पलटवार, थेट डोनाल्ड ट्रम्पशी केली तुलना, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ravi rana | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. मात्र प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी त्यांच्याच संघटनेचा उमेदवार दिला आहे. बच्चू कडू हे राणांविरोधात अमरावतीमध्ये सभा घेत हल्ला करत आहेत. त्यांनी नवनीत राणा यांनी वाटलेल्या साड्यांवरून हल्लाबोल चढवला केला..

“17 रूपयांची साडी.., 2 कोटींची गाडी”

प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली आहे. “17 रूपयांची साडी घेऊन मेळघाटची बेइज्जती केली. आपण 2 कोटींच्या गाडीतून फिरायचं. लोकांना 17 रूपयांच्या साडीने गुलामीकडं न्यायचं. 17 रूपयांची साडी मतपरिवर्तन करू शकत नाही. मेळघाट येथे वाटलेल्या साड्यांवर बच्चू कडू यांनी जोरदार टीका केली. नवनीत राणांचं (Navneet Rana) डिपॉझिट आम्ही जप्त करणार आहोत. आता तीर दूर गेलेला आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.

याआधीदेखील बच्चू कडू आणि राणा यांच्यात वाद झाला होता मात्र तो वाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी मिटवला. आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी नवनीत राणांना त्यांच्या गाडीवरून डिवचल्याने रवि राणा (Ravi rana) यांनी बच्चू कडूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले रवि राणा?

बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात टीका केली होती आता रवि राणा (Ravi rana) यांनी बच्चू कडू यांच्यावर पलटवार केला आहे. “मी चार ते पाच वेळा शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये गेलो आहे. अन्न त्याग केला आहे. शेतकऱ्यांसाठी लढलो आहे. काही लोकं राजकारणामध्ये नौटंकी करायला आले आहेत. बोलणं फार सोपं आहे”, असं म्हणत रवि राणा (Ravi rana) यांनी बच्चू कडूंवर पलटवार केला आहे. त्यानंतर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची बच्चू कडू यांच्याशी थेट तुलना केली आहे.

डोनाल्ड ट्रम्पची बच्चू कडू यांच्याशी थेट तुलना

“डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या जागी बच्चू कडूंना बसवलं पाहिजे. ते अमेरिकेतून देशावर लक्ष ठेवतील”, असा हल्ला रवि राणा (Ravi rana) यांनी बच्चू कडू यांच्यावर केला आहे.

यावेळी राणा यांनी बच्चू कडू यांना “वेळ आल्यावर मी उत्तर देईल. मी बच्चू कडूंना किराणा वाटतो. त्यांनी स्वत:च्या खिशात हात घालून पहावं”, असं म्हणत रवि राणा यांनी बच्चूकडूंवर पलटवार केला.

News Title – Ravi rana Replied To Bachuchu Kadu On His Statement

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेता रणबीर कपूरचा मोठा खुलासा!

पुणे हादरलं! एकतर्फी प्रेमातून घडला अत्यंत भयंकर प्रकार

पुणेकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार

अमोल कोल्हेंच्या अडचणी वाढल्या; मतदारसंघातील ‘त्या’ बॅनरने खळबळ

तणाव दूर करण्यासाठी रामबाण उपाय, ‘असा’ करा लाईफस्टाइलमध्ये बदल