तणाव दूर करण्यासाठी रामबाण उपाय, ‘असा’ करा लाईफस्टाइलमध्ये बदल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mental Health Care | जीवनात प्रत्येकावर काही न काही गोष्टींचा प्रचंड तणाव असतो. त्यातच खाण्या-पिण्याच्या सवयी देखील आता बदलल्या आहेत. सतत कामाच्या ताणामुळे जेवणाच्या वेळाही बदलल्या आहेत. त्यामुळे फास्ट फूड खाऊन पोट भरण्यावर अधिक भर दिला जातो.

त्यातच व्यायाम केला नाहीतर त्याचा शरीरावर आणि मानसिकतेवर खूप परिणाम होत असतो. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. तुम्ही ताण-तणाव पासून दूर राहण्यासाठी कोणते पाऊल घेता, ते महत्वाचं ठरतं. तुम्ही तुमच्या लाईफस्टाइलमध्ये थोडे फार बदल केले तर, तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.

तणाव असेल तर त्याचा थेट परिणाम शरीरावर होत असतो. आपला दिवस डी स्ट्रेस करण्यासाठी आपले स्नॅक्स काळजीपूर्वक निवडणे आणि मखाना, बदाम, बेरी किंवा ग्रीक दही असे पौष्टिक समृद्ध पदार्थांचा समावेश करणं महत्वाचं आहे.

जंक फूडऐवजी ‘हे’ पदार्थ खा

केळी : केळी त्वरित एनर्जि प्रदान करते. केळी पोषक तत्वांनी भरलेली असते. केळीमध्ये पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते आणि तणावपूर्ण परिस्थितीतही हृदयाचे कार्य स्थिर ठेवते. यासोबतच पोर्टेबल स्नॅक म्हणून केळी कुठेही सहज उपलब्ध असते.

बदाम :  बदाम मॅग्नेशियमने भरलेले आहे. यामुळे तणावाचा (Mental Health Care) सामना करण्यास मदत मिळते. बदाम अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. तसंच तणाव-प्रेरित मुक्त रॅडिकल्सच्या हानिकारक प्रभावांपासून शरीराचे संरक्षण करते त्यामुळे दररोज बदाम खायला हवे.

ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये एल-थियानिन नावाचे अमिनो अ‍ॅसिड असते, जे विश्रांतीस प्रोत्साहित करते आणि तणावाची पातळी कमी करते. त्यामुळे चहा किंवा कॉफीऐवजी एक कप ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता. ती आरोग्यासाठी देखील चांगली असते.

हंगामी बेरी आणि फळे : तणावाचा (Mental Health Care) सामना करण्यास संत्री, द्राक्षे, टरबूज, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी सर्वात योग्य आहेत, तसेच ते अँटीऑक्सिडंट्सने भरलेले आहेत जे तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात. यामुळे तुम्हाला त्वरित प्रसन्न वाटते.

मखाना : मखानामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम सारख्या सूक्ष्म पोषक घटकांचा समावेश आहे आणि त्यात गॅलिक अ‍ॅसिड आणि एपिकॅटेचिन सारखे अँटीऑक्सिडेंट संयुगे देखील आहेत जे जळजळ कमी करतात आणि तणाव दूर करतात.

News Title- Mental Health Care

महत्त्वाच्या बातम्या –

उद्या भारतात दिग्गज ऑटो कंपन्यांशी तगडी स्पर्धा होणार; SUV Taisor लाँच होणार

एप्रिल महिन्यात तापमान कसं असणार?, हवामान विभागाची मोठी अपडेट समोर 

जाणून घ्या IPL च्या 10 टीमचे मालक कोण आहेत? अन् त्यांची संपत्ती

मुंबईच्या पराभवाची हॅटट्रिक! हार्दिक चाहत्यांच्या निशाण्यावर, रोहितच्या कृतीनं मन जिंकलं, Video

हार्दिकसाठी चीअर करण्याचं आवाहन; पण पांड्याची झाली फजिती, नेमकं काय घडलं?