उद्या भारतात दिग्गज ऑटो कंपन्यांशी तगडी स्पर्धा होणार; SUV Taisor लाँच होणार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Toyota Taisor SUV in India l जपानची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टोयोटा लवकरच भारतीय बाजारपेठेत नवीन एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत आहे. SUV Taisor सादर करण्यापूर्वी कंपनीने त्याचा टीझर रिलीज केला आहे. टोयोटा इंडियाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर मारुती सुझुकी स्विफ्ट-आधारित क्रॉसओवर असणार आहे. हे मॉडेल 3 एप्रिल 2024 रोजी भारतात लाँच होणार आहे, त्यानंतर येत्या काही महिन्यांत त्याच्या किमती जाहीर केल्या जाणार आहेत.

Toyota Taisor चा टीझर रिलीज :

टोयोटाने नवीन SUV Taisor चा टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये एलईडी दिवे आणि डीआरएल तसेच लाल रंग स्पष्टपणे दिसत आहे. याशिवाय वाहनात क्रोम आणि साइड इंडिकेटरही स्पष्टपणे दिसत आहेत. तसेच टोयोटाची ही एसयूव्ही मारुतीच्या फ्रंटची री-बॅज केलेली आवृत्ती असणार आहे.

सुरक्षिततेच्या बाबतीत बोलायचे झाले तर यामध्ये सहा एअरबॅग्ज, 360 डिग्री कॅमेरा, ESP, हिल होल्ड असिस्ट, रियर कॅमेरा, थ्री पॉइंट सीट बेल्ट तसेच क्रूझ कंट्रोल, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, की सुसज्ज एंट्री, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, 22.86 सेमी स्मार्ट आहे.

Toyota Taisor SUV in India l SUV Taisor उद्या होणार लाँच :

नवीन SUV Taisor अधिकृतपणे भारतीय बाजारात लाँच होणार आहे. कंपनीच्या वेबसाइटवर मिळालेल्या माहितीनुसार 3 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता SUV Taisor सादर केली जाणार आहे. तसेच Taisor हे भारतातील टोयोटा मोटर्स आणि मारुती यांच्यातील भागीदारीतील चौथे वाहन असणार आहे. यापूर्वी टोयोटाच्या अर्बन क्रूझर हायब्रीड आणि मारुती ग्रँड विटारा या एकाच प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या एसयूव्ही होत्या.

याशिवाय मारुती टोयोटा रुमिओनच्या नावाने Ertiga MPV ऑफर करते. दोन कंपन्यांमधील भागीदारीनंतर, टोयोटाने रीबॅजेड आवृत्ती म्हणून सादर केलेली पहिली कार ग्लान्झा आहे, जी मारुती बलेनोवर आधारित आहे.

News Title- Toyota Taisor SUV in India

महत्त्वाच्या बातम्या –

एप्रिल महिन्यात तापमान कसं असणार?, हवामान विभागाची मोठी अपडेट समोर 

जाणून घ्या IPL च्या 10 टीमचे मालक कोण आहेत? अन् त्यांची संपत्ती

मुंबईच्या पराभवाची हॅटट्रिक! हार्दिक चाहत्यांच्या निशाण्यावर, रोहितच्या कृतीनं मन जिंकलं, Video

हार्दिकसाठी चीअर करण्याचं आवाहन; पण पांड्याची झाली फजिती, नेमकं काय घडलं?

वानखेडेवर घडला धक्कादायक प्रकार, पहिल्यांदा रोहित शर्मा सुद्धा घाबरला, पाहा Video