वानखेडेवर घडला धक्कादायक प्रकार, पहिल्यांदा रोहित शर्मा सुद्धा घाबरला, पाहा Video

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MI vs RR 2024 | आयपीएलच्या सतराव्या हंगामातील चौदाव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (MI vs RR Match) हे संघ भिडले. मुंबईचा संघ यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना आपल्या घरच्या मैदानावर खेळण्यासाठी आला. नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या यजमान मुंबईसाठी ट्रेन्ट बोल्ट काळ ठरला. त्याने रोहित शर्मा आणि नमन धीर यांना दोन चेंडूत बाहेरचा रस्ता दाखवला. बोल्टच्या घातक गोलंदाजीने मुंबईच्या फलंदाजीची कंबर मोडली. (IPL 2024 News)

कर्णधार हार्दिक पांड्याने कसाबसा डाव सावरला आणि 34 धावांची खेळी केली. बोल्टनंतर युझवेंद्र चहलने यजमानांची डोकेदुखी वाढवली. अखेर मुंबईचा संघ निर्धारित 20 षटकांत 9 बाद केवळ 125 धावा करू शकला. आव्हानाचा बचाव करताना मुंबईचा संघ क्षेत्ररक्षणासाठी आला तेव्हा एक अनोखी घटना घडली.

रोहितचा फॅन थेट मैदानात शिरला

मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माचा अतिउत्साही चाहता लाईव्ह सामन्यात थेट मैदानात शिरला. चाहत्याचा शिरकाव पाहून हिटमॅन देखील अवाक् झाला. मग संबंधित चाहत्याने रोहितच्या पाया पडून आणि इशान किशनला मिठी मारून सीमारेषेकडे कूच केली. चाहत्याचा शिरकाव पाहून सुरक्षा रक्षकांनी त्याच्या दिशेने धाव घेतली. पण, तोपर्यंत तो चाहता रोहित आणि इशानपर्यंत पोहोचला होता. मग सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर नेले.

 

MI vs RR 2024 थरार

तत्पुर्वी, ट्रेन्ट बोल्ट आणि युझवेंद्र चहल यांनी मुंबईच्या फलंदाजांची बोलती बंद केली. या जोडीने प्रत्येकी 3-3 बळी घेण्याची किमया साधली. तर नांद्रे बर्गरला (2) आणि आवेश खानला (1) बळी घेण्यात यश आले. मुंबईकडून कर्णधार हार्दिकने सर्वाधिक 34 धावा केल्या, तर तिलक वर्मा (32), रोहित शर्मा (0), नमन धीर (0), इशान किशन (16), पियुष चावला (3), टीम डेव्हिड (17), गेराल्ड कोएत्झी (4), जसप्रीत बुमराह (नाबाद 8 धावा) आणि आकाश मधवालने नाबाद (4) धावा केल्या.

मुंबईचा संघ –

हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, गेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.

राजस्थानचा संघ –

संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.

News Title- IPL 2024 MI vs RR 2024 rohit sharma fan entered in stadium in live match at wankhede
महत्त्वाच्या बातम्या –

‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’, वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांची घोषणाबाजी

आचार्य चाणक्यांनी सांगितल्या प्रमाणे करा दिवसाची सुरुवात; होईल फायदाच फायदा

मराठा बांधवांनी अशोक चव्हाणांच्या गाडीचा ताफा अडवला अन्…

‘या’ गोष्टीमुळे हवामान विभागाला वातावरणाचा अंदाज समजतो!

मोठी बातमी! चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात