हार्दिकसाठी चीअर करण्याचं आवाहन; पण पांड्याची झाली फजिती, नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hardik Pandya | मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून हार्दिक पांड्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. आयपीएल (IPL 2024) सुरू होण्यापूर्वी हार्दिकला केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल केले जात होते. पण, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात हार्दिकला प्रत्यक्षपणे चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. तो रोष अद्याप कायम असून मुंबईच्या आपल्या घरच्या मैदानावर अर्थात वानखेडे स्टेडियमवर याचा प्रत्यय आला. सोमवारी मुंबई आणि राजस्थान रॉयल्स हे संघ भिडले. (IPL 2024 News)

मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन नाणेफेकीसाठी आले तेव्हा एक हास्यास्पद तितकीच खेळभावनेला तडा जाईल अशी घटना घडली. खरं तर झाले असे की, दोन्हीही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी आले असता टीव्ही प्रेक्षेंटर संजय मांजरेकर यांनी हार्दिक पांड्यासाठी चाहत्यांना चीअर करण्याचे आवाहन केले. पण, सर्वकाही उलटे झाले आणि चाहत्यांनी काही वेळ शांत बसणे पसंत केले.

मुंबईची निराशाजनक कामगिरी

मग काही वेळ शांत राहिल्यानंतर चाहत्यांनी हार्दिकला हूटिंग करण्यास सुरुवात केली. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये फक्त ‘रोहित रोहित’ असा आवाज घुमत होता. मुंबईचा माजी कर्णधार रोहितच्या घोषणांनी स्टेडियम दणाणले होते. प्रेक्षकांनी हार्दिकला दिलेली ही वागणूक पाहून त्याचा चेहरा पडलेला दिसला. हार्दिकचा चेहरा सर्वकाही सांगत आहे, त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

 

Hardik Pandya ची फजिती

दरम्यान, मुंबईचा संघ यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना आपल्या घरच्या मैदानावर खेळण्यासाठी आला. पण, राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्ट यजमानांसाठी काळ ठरला. नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बोल्टने रोहित शर्मा आणि नमन धीर यांना दोन चेंडूत बाहेरचा रस्ता दाखवला. मग युझवेंद्र चहलने कमाल केली. मुंबईचा संघ निर्धारित 20 षटकांत 9 बाद केवळ 125 धावा करू शकला.

मुंबईचा संघ –

हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, गेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.

राजस्थानचा संघ –

संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, आर अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.

News Title- Mumbai Indians Captain Hardik Pandya Got Booed During Toss in mi vs rr match in ipl 2024
महत्त्वाच्या बातम्या –

रोहितचा फॅन थेट मैदानात शिरला; हिटमॅनलाही धक्का बसला, सर्वांची उडाली धांदल, Video

‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’, वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांची घोषणाबाजी

आचार्य चाणक्यांनी सांगितल्या प्रमाणे करा दिवसाची सुरुवात; होईल फायदाच फायदा

मराठा बांधवांनी अशोक चव्हाणांच्या गाडीचा ताफा अडवला अन्…

‘या’ गोष्टीमुळे हवामान विभागाला वातावरणाचा अंदाज समजतो!