‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’, वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांची घोषणाबाजी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Sharma | मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये लढत सुरू आहे. हा सामना सुरू होण्याआधी दोन्ही संघांमध्ये नाणेफेक झाली. त्यावेळी राजस्थान रॉयल्सने नाणेफेकी जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. राजस्थान रॉयल्स हा संघ सलग दोन्ही सामने विजयी झाला आहे. याउलट मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वामध्ये सलग दोनदा पराभूत झाला आहे. (Rohit Sharma)

काही दिवसांआधी मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) संघाच्या कर्णधारपदावरून काढण्यात आलं. मात्र तरीही चाहत्यांच्या मनात रोहित शर्माबद्दलचं (Rohit Sharma) प्रेम अधिकच वाढलेलं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सध्या त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएलमध्ये वानखेडे स्टेडिअम होम ग्राऊंडवर खेळला जाणारा पहिला सामना आहे. मोठ्या प्रमाणात मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी गर्दी केली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओची सर्वत्र चर्चा आहे. हा व्हिडीओ वानखेडे स्टेडिअमच्या बाहेरचा असल्याचा दावा त्या व्हिडीओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

“मुंबईचा राजा रोहित शर्मा”

व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे समर्थक आणि रोहित शर्माचे चाहते उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत. त्यांनी मुंबई इंडियन्स संघाची जर्सी परिधान केली आहे. त्यामध्ये एका चाहत्याने आपल्या शरीरावर पूर्ण निळ्या रंगाने रंगवलं आहे. त्या व्यक्तीने रोहित शर्मा (Rohit Sharma) दिसताच “मुंबईचा राजा रोहित शर्मा”, अशा घोषणा दिल्या आहेत. त्यामागे इतर चाहत्यांनी देखील घोषणा दिल्या आहेत.


राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोवमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, आर अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, केशव महाराज, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

News Title – Rohit Sharma Supporter Say ‘Mumbai Ka raja rohit Sharma’ Video Viral

महत्त्वाच्या बातम्या- 

आचार्य चाणक्यांनी सांगितल्या प्रमाणे करा दिवसाची सुरुवात; होईल फायदाच फायदा

मराठा बांधवांनी अशोक चव्हाणांच्या गाडीचा ताफा अडवला अन्…

‘या’ गोष्टीमुळे हवामान विभागाला वातावरणाचा अंदाज समजतो!

मोठी बातमी! चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात

“वेळ आली की मी…”, निलेश लंके यांचं मोठं वक्तव्य