“वेळ आली की मी…”, निलेश लंके यांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nilesh Lanke | पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. लंके आता अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

निलेश लंके यांनी स्वाभिमानी जनसंवाद यात्रा काढली आहे. जनतेशी संवाद साधण्यासाठी त्यांनी ही यात्रा काढली आहे. या दरम्यान त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आलं आहे. वेळ आली की, मी सगळं सांगेल, असं निलेश लंके म्हणाले आहेत.

काय म्हणाले निलेश लंके?

मोहटा देवीला नतमस्तक होऊन आज यात्रेला सुरुवात करत आहे. राजकारण ही विचारांची लढाई आहे. ती विचारांनीच लढायला पाहिजे. एखादा कार्यकर्ता विरोधात गेला की त्याची चौकशी लावणे, त्याच्यावर काहीतरी गुन्हा लावणे असले प्रकार आता वाढले आहेत, असंही ते म्हणालेत.

कुणी पुढं आलं की त्याला कसं दाबता येईल, याचे प्रयत्न केले जात आहेत. पण जनतेची ताकद माझ्या पाठीमागे आहे. लोकांच्या पाठिंब्याने मी खासदार होणारच, असा निर्धारच लंके यांनी केला आहे. यावेळी त्यांनी सुजय विखे यांच्यावरही निशाणा साधला.

माझ्या उमेदवारीचा खूप जास्त आनंद हा शिवसैनिकांना झालाय. आता मी नगर दक्षिणच्या प्रत्येक गावांत जाऊन त्यांची अडचण समजून घेणार आहे. नाहीतर, काही जण पाच वर्ष फिरत नाहीत तर साखर-गुळ वाटायला येतात. यांनी फक्त त्रास देण्याचं काम केलंय, असा टोला लंके (Nilesh Lanke) यांनी सुजय विखे यांना लगावला.

या यात्रेदरम्यान लंके यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आपल्याकडे काही सीनियर लोक आहेत. पण, चुकीच्या पद्धतीने त्यांनी काम केलंय. याबाबत सगळ्यांनाच माहित आहे. वेळ आली की, मी सगळं सांगेल, असं निलेश लंके म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची आता एकच चर्चा रंगली आहे.

News Title : Nilesh Lanke statement in discussion

महत्त्वाच्या बातम्या-

चुकूनही ‘या’ दिवशी नखे कापू नयेत; अन्यथा या गोष्टींचा करावा लागेल सामना

‘पलटूराम शेवटी आपला आवाका दाखवला’; शिवतारेंना कार्यकर्त्यांनी सुनावलं

कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार; SSC मध्ये तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु

वर्कआउट दरम्यान ‘या’ चुका पडू शकतात महागात; अशी घ्या काळजी

अरे भाऊ म्युच्युअल फंड म्हणजे काय रे? अन् त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी