अरे भाऊ म्युच्युअल फंड म्हणजे काय रे? अन् त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

What is Mutual Fund l आजकाल गुंतवणुकीसाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा लोकप्रिय पर्याय बनला असला तरी त्यात जोखीम देखील आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूक करण्याआधीच अनेकजण घाबरतात. पण अजूनही कित्येक लोकांना म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे? आणि त्यामध्ये गुंतवणूक कशी करावी जेणेकरून जोखीम कमी होईल हे आज आपण जाणून घेणार आहोत.

What is Mutual Fund l म्युच्युअल फंड म्हणजे नेमका काय आहे?:

म्युच्युअल फंड हा देखील एक प्रकारचा फंड आहे. म्युच्युअल फंडमध्ये अनेक लोक एकाच ठिकाणी पैसे जमा करतात. तसेच गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे स्टॉक, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्स, बाँड्स आणि इतर प्रकारच्या इक्विटीमध्ये गुंतवले जात असतात.

तसेच मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या म्युच्युअल फंड व्यवस्थापित करत असतात. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांकडे अनेक म्युच्युअल फंड योजना देखील आहेत. त्यामुळे जो कोणी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतो त्याला फंडाचा नफा, तोटा, उत्पन्न इत्यादींचा हिस्सा मिळतो.

म्युच्युअल फंडाचे प्रकार किती आहे? :

– इक्विटी फंडात गुंतवलेली रक्कम शेअर बाजारात वापरली जात असते.
– डेट फंडांमध्ये गुंतवणूकदारांकडून घेतलेले पैसे ट्रेझरी बिल, कॉर्पोरेट बाँड आणि सरकारी सिक्युरिटीजसाठी वापरले जातात.
– बॅलन्स किंवा हायब्रिड फंड हे इक्विटी आणि डेट फंड यांचे मिश्रण आहेत. यामध्ये गुंतवणूकदार कोणतीही जोखीम न घेता केवळ फायद्यासाठी गुंतवणूक करतो.
– विशिष्ट ध्येयासाठी सोल्युशन ओरिएंटेड फंडांमध्ये गुंतवणूक केली जाते. एक प्रकारे हे इक्विटी, डेट आणि हायब्रिड फंडाचे मिश्र स्वरूप आहे.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी? (How to invest in Mutual Fund?) :

– गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात एकरकमी पैसे गुंतवू शकतात किंवा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे देखील गुंतवणूक करू शकतात.
– याव्यतिरिक्त म्युच्युअल फंडामध्ये थेट गुंतवणूक देखील केली जाऊ शकते म्हणजेच तुम्ही वेबसाइट किंवा ॲपला भेट देऊन गुंतवणूक करू शकता. यामध्ये कमी फंड हाउस चार्जेस भरावे लागतात.

म्युच्युअल फंडात तोटा कसा होतो? :

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीच्या रकमेत नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक दिग्गज तज्ञांच्या मते म्युच्युअल फंडांची कामगिरी चांगली असल्यामुळे जोखीम होण्याची शक्यता देखील कमी झाली आहे.

वास्तविक, म्युच्युअल फंड हा शेअर मार्केटशी जोडलेला असतो. अशा परिस्थितीत तुम्ही कोणत्या फंडात गुंतवणूक केली आहे हे महत्वाचे आहे. कारण त्यावरून तुमचे नुकसान होणार आहे की नाही हे ठरत असते. जर तुम्ही इक्विटी फंडात गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला शेअर बाजाराच्या हालचालीनुसार नफा किंवा तोटा मिळतो.

News Title- What is Mutual Fund

महत्त्वाच्या बातम्या –

पुण्यात चाललंय काय?; सोशल मीडियावर धंगेकरांचा ‘तो’ फोटो व्हायरल

Suzuki V-Storm 800DE बाईक बाजारात धुमाकूळ घालणार; होंडा कंपनीशी होणार तगडी स्पर्धा

प्रेक्षकांना आता घरबसल्या ‘शैतान’ चित्रपट पाहता येणार; यादिवशी ओटीटीवर रिलीज होणार

‘या’ नियमात बदल!; सर्वसामान्यांच्या खिशावर होतील परिणाम; वाचा सविस्तर

वानखेडेवर MI vs RR; मुंबई विजयाचं खातं उघडण्यास उत्सुक