‘या’ नियमात बदल!; सर्वसामान्यांच्या खिशावर होतील परिणाम; वाचा सविस्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rules Changed From April 1 | आजपासून (1 एप्रिल) नवीन आर्थिक वर्ष सुरु झालं आहे. त्यामुळे या नवीन आर्थिक वर्षात काही नियम बदलण्यात आले आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठे परिणाम होतील. देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेली कर प्रणाली आजपासून लागू होणार आहे.

‘या’ नियमात होणार बदल

LPG सिलेंडर स्वस्त : आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 32 रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यानुसार मुंबईत हा सिलेंडर 31.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर दिल्लीत 30.50 रुपयांनी गॅस सिलेडर स्वस्त झाला आहे.

ईपीएफओचा नवीन बदलला : कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) फंड बॅलेन्ससाठी ऑटोमेटिक ट्रांसफर सिस्टम लागू करण्यात आली आहे. म्हणजेच तुम्ही नवीन कामाच्या ठिकाणी जाता तेव्हा मॅन्युअल फंड ट्रांसफर करावी लागते. पण आता ऑटोमेटीक प्रणालीने हे काम होणार आहे.

नवीन कर प्रणाली : आजपासून (Rules Changed From April 1) नवीन कर प्रणाली लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार, तुम्ही जुनी कर व्यवस्था निवडत नाही तोपर्यंत तुमची कर गणना नवीन नियमांनुसार आपोआप केली जाईल. नवीन प्रणालीसाठी कर मर्यादा आर्थिक वर्ष 2024-25 आणि 2025-26 साठी समान राहणार आहे. तुमचे वार्षिक उत्पन्न 7 रुपये किंवा त्याहून कमी असल्यास, तुम्हाला नवीन प्रणाली अंतर्गत कोणताही आयकर भरावा लागणार नाही.

पेन्शनसाठी टू फॅक्टर ऑथन्टिकेशन : म्हणजेच PFRDA राष्ट्रीय पेन्शन प्रणालीसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू होणार आहेत. पासवर्डद्वारे सीआरए प्रणालीमध्ये प्रवेश करण्यासाठी सिस्टममध्ये टू फॅक्टर ऑथन्टिकेशन लागू केले आहे.

टोयोटाची निवडक वाहने महाग : आजपासून (Rules Changed From April 1) टोयोटा किर्लोस्कर मोटरची काही निवडक वाहने महाग झाली आहेत. उत्पादन खर्च आणि परिचालन खर्चात वाढ झाल्यामुळे 1 एप्रिलपासून कंपनीने निवडक वाहनांच्या किंमती एक टक्क्याने वाढवण्याची घोषणा केली होती.

ई-वाहनांना सबसिडी नाही : इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या FAME-2 योजनेला सरकार 31 मार्चनंतर बंद करणार आहे. या योजनेची मुदत वाढवण्याच्या वृत्ताचे खंडन करताना अवजड उद्योग मंत्रालयाने सदरील माहिती दिली आहे.

किआ वाहने महाग आहेत : ऑटोमोबाईल कंपनी Kia India ची वाहने आजपासून तीन टक्क्यांनी महाग झाली आहेत. कंपनी Kia Seltos, Sonet आणि Carens मॉडेल विकते.

News Title : Rules Changed From April 1

महत्त्वाच्या बातम्या-

CSK ची हार पण धोनीचा भारी ‘पंच’, चाहत्यांचा एकच जल्लोष; ठरला ऐतिहासिक सामना

धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-20 मध्ये असं करणारा बनला जगातील पहिला खेळाडू

WHAT A CATCH! अद्भुत अविश्वसनीय; CSK च्या शिलेदाराचा अप्रतिम झेल, Video

“हिंमत असेल तर पक्षाच्या बॅनरवर ईडी, सीबीआयचे फोटो लावा”, उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले

बाबरला पुन्हा कर्णधार बनवल्याने शाहिद आफ्रिदी संतापला, जावयाला डच्चू!