धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-20 मध्ये असं करणारा बनला जगातील पहिला खेळाडू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MS Dhoni | महेंद्रसिंग धोनी म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार… धोनीने सर्वाधिकवेळा आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची किमया साधली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा धोनी आयपीएलसारख्या लोकप्रिय (IPL 2024) लीगमध्ये देखील आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित करतो. कदाचित यंदाचा आयपीएल हंगामात हा धोनीच्या कारकिर्दीतील अखेरचा असू शकतो. नाना विक्रमांना गवसणी घालणाऱ्या कॅप्टन कूलने आता आणखी एक जागतिक विक्रम केला आहे. (MS Dhoni News)

आयपीएलच्या सतराव्या हंगामातील तेराव्या सामन्यात धोनीने विश्वविक्रम करण्याची किमया साधली. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (CSK vs DC) यांच्यातील सामन्यात धोनीने हा भीमपराक्रम केला. पृथ्वी शॉचा झेल घेताच माहीने विश्वविक्रम केला. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अर्थात ट्वेंटी-20 मध्ये यष्टीरक्षक म्हणून 300 फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात धोनीला यश आले. असं करणारा तो जगातील पहिला यष्टीरक्षक खेळाडू ठरला आहे.

धोनीचा भीमपराक्रम

यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक फलंदाजांना बाहेर पाठवणाऱ्यांच्या यादीत धोनी पहिल्या तर दिनेश कार्तिक दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत पाकिस्तानचा कामरान अकमल, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डीकॉक आणि इंग्लंडला जोस बटलर हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. 42 वर्षीय धोनीने दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉला बाद करून ऐतिहासिक कामगिरी केली.

MS Dhoni टॉपवर (सर्वाधिक बळी घेणारे यष्टीरक्षक)

महेंद्रसिंग धोनी (भारत) – 300
दिनेश कार्तिक (भारत) – 247
कामरान अकमल (पाकिस्तान) – 247
क्विंटन डॉकॉक (दक्षिण आफ्रिका) – 270
जोस बटलर (इंग्लंड) – 209

 

CSK चा संघ –

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चाहर, तुषार देशपांडे, मथीक्क्षा पथिराना, मुस्तफिजुर रहमान.

DC चा संघ –

रिषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, एनरिक नॉर्तजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.

News Title- MS Dhoni becomes the 1st WicketKeeper to complete 300 Dismissal in T20 history in CSK vs dc match in IPL 2024
महत्त्वाच्या बातम्या –

WHAT A CATCH! अद्भुत अविश्वसनीय; CSK च्या शिलेदाराचा अप्रतिम झेल, Video

“हिंमत असेल तर पक्षाच्या बॅनरवर ईडी, सीबीआयचे फोटो लावा”, उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले

बाबरला पुन्हा कर्णधार बनवल्याने शाहिद आफ्रिदी संतापला, जावयाला डच्चू!

‘आम्ही मित्रच…’; अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचं मनोमिलन

यंदाची निवडणूक जिंकणार का?, सुप्रिया सुळे म्हणाल्या…