WHAT A CATCH! अद्भुत अविश्वसनीय; CSK च्या शिलेदाराचा अप्रतिम झेल, Video

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | आयपीएलच्या सतराव्या हंगामातील तेराव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (DC vs CSK) हे संघ भिडले. पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नईने सुरुवातीचे दोन्हीही सामने जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. अखेर पृथ्वी शॉला आयपीएलच्या यंदाच्या हंगामात खेळण्याची संधी मिळाली. पहिल्या दोन सामन्यांना मुकलेल्या पृथ्वीने संधी मिळतात स्फोटक खेळी केली. (IPL 2024 News)

डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ या जोडीने दिल्लीसाठी चांगली सुरुवात केली. त्यांनी पहिल्या बळीसाठी 93 धावांची भागीदारी नोंदवली. पण, मथीक्क्षा पथिरानाच्या (Matheesha Pathirana) अप्रतिम झेलने वॉर्नरला बाहेरचा रस्ता दाखवून दिल्लीला पहिला झटका दिला. मुस्तफिजुर रहमानच्या गोलंदाजीवर वॉर्नरने चांगला फटका मारला पण पथिरानाच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाने वॉर्नरला तंबूत पाठवले. (Matheesha Pathirana Catch Video)

पथिरानाचा अप्रतिम झेल

खरं तर मुस्तफिजुर रहमान चेन्नईसाठी दहावे षटक घेऊन आला. या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर पथिरानाने क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून कमाल केली. सीमारेषेच्या दिशेने कूच करत असलेल्या चेंडूच्या वाटेत पथिराना आला आणि त्याने अविश्वसनीय झेल टिपला, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. वॉर्नर 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 35 चेंडूत 52 धावा करून तंबूत परतला.

 

IPL 2024 चा थरार

यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना खेळत असलेल्या पृथ्वी शॉने 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 27 चेंडूत 43 धावांची शानदार खेळी केली. मथिरानाने वॉर्नरचा झेल घेताच चेन्नईच्या खेळाडूंनी त्याच्या दिशेने धाव घेतली. धोनीसह सर्वांनीच त्याचे कौतुक केले. मथिरानाने घेतलेला झेल आयपीएलच्या सतराव्या हंगामातील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल ठरला आहे.

CSK चा संघ –

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चाहर, तुषार देशपांडे, मथीक्क्षा पथिराना, मुस्तफिजुर रहमान.

DC चा संघ –

रिषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, एनरिक नॉर्तजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.

News Title- IPL 2024 CSK vs DC Matheesha Pathirana takes an amazing catch of David Warner Watch video
महत्त्वाच्या बातम्या –

“हिंमत असेल तर पक्षाच्या बॅनरवर ईडी, सीबीआयचे फोटो लावा”, उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले

बाबरला पुन्हा कर्णधार बनवल्याने शाहिद आफ्रिदी संतापला, जावयाला डच्चू!

‘आम्ही मित्रच…’; अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचं मनोमिलन

यंदाची निवडणूक जिंकणार का?, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

वाढदिवसादिवशी ऑनलाईन केक मागवला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, व्हिडीओ व्हायरल