वाढदिवसादिवशी ऑनलाईन केक मागवला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Viral Video | घरबसल्या तुम्ही कोणत्याही गोष्टी सहज ऑनलाईन मागू शकता. भाजीपाल्यासह, किराना सामानचासुद्धा यामध्ये समावेश होतो. एवढंच नाही तर तुम्ही बील देखील फोेनवरुनच भरु शकता. ऑनलाईनमुळे सगळ्या गोष्टी एकदम सहजरित्या तुमच्या हातात मिळत आहेत. अनेकवेळा बरेच लोक खाद्यपदार्थ सुद्धा अॅपवरुन मागवत असतात. मात्र ऑनलाईन खाद्यपदार्थ तुमचा जिव घेऊ शकतात. पंजाबमध्ये असाच धक्कादायक प्रकार घडलाय. वाढदिवसादिवशी ऑनलाईन केक मागवल्यामुळे चिमुकलीला आपला जिव गमवावा लागला आहे.

काय आहे प्रकरण?

पंजाब येथे एका कुटुंबातील 10 वर्षीये चिमुकलीचा वाढदिवस तिच्या आई वडिलांनी साजरा केला. मानवी असं या चिमुकलीचं नाव होतं. दरम्यान, या वेळी ऑनलाईन केक मागवण्यात आला होता. वाढदिवसाचं सेलिब्रशन झाल्यानंतर घरातील सर्वांनी केक (Viral Video)  खाल्ला. मात्र, केक खाल्ल्यानंतर कुटुंबातील सर्वांना त्रास होऊ लागला.

कुटुंबातील सदस्यांना (Viral Video) उलट्या सुरु झाल्या. ‘बर्थ डे गर्ल’ असलेली दहा वर्षीय मानवी हिलाही उलट्या सुरु झाल्या. तिचे शरीर थंड पडले. तातडीने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मानवीबाबत घडलेल्या घटनेचा व्हिडीओ तिच्या आजोबांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडियार व्हिडीओ व्हायरल-

मानवीचे आजोबा हरबंस यांनी सोशल मीडियावर याबद्दल सांगत व्हिडीओ शेअर केला आहे. झोमॅटोवरुन केक मागवला होता. त्यानंतर केक खाल्यानंतर सर्वांना त्रास सुरु झाला. या घटनेत नातीचा मृत्यू झाला. या प्रकरणात आरोग्य विभागाने काहीच कारवाई केली नाही.

पोलिसांकडून कारवाई-

घडलेल्या प्रकारामुळे आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पंजाब पोलिस अधिकारी सुरिंदर सिंग यांनी म्हटले की, घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. केक आलेल्या ठिकाणावर जाऊन तपास करण्यात येणार आहे.

News Title : viral video girl ate cake and dies

महत्त्वाच्या बातम्या-

पांड्याला ट्रोल केल्यास कारवाई होणार? मुंबई क्रिकेट असोसिएशननं सांगितलं सत्य

फक्त अशी घरं पाहून मारायचे डल्ला, मुंबईच्या चोरट्यांची पुण्यातल्या घरांवर वक्रदृष्टी

“राहुल गांधींनी चित्रपट पाहावा, मी स्वतः माझ्या खर्चाने थेअटर बुक करेन”

आयपीएलमुळे एकाचा बळी; अत्यंत धक्कादायक घटना समोर

‘या’ 5 लोकांशी ठेवू नका जास्त मैत्री, अन्यथा…