“राहुल गांधींनी चित्रपट पाहावा, मी स्वतः माझ्या खर्चाने थेअटर बुक करेन”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Devendra Fadanvis | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशातच सध्या देशभरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सिनेमा 22 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. याचं दिग्दर्शन आणि अभिनय अशा दोन्ही बाजू रणदीप हुड्डानं सांभाळल्या आहेत. महाराष्ट्राचे वीर सावरकर यांनी राज्यासाठी देशासाठी वेचलेलं आयुष्य, काळ्यापाण्याची शिक्षा, देशातील कायद्यांबाबतचा अभ्यास या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट आता मराठी भाषेमध्येही प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपस्थिती दर्शवली. त्यावेळी माध्यमांशी बोलत असताना फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना चित्रपट पाहण्यासाठी निमंत्रित केलं आहे.

राहुल गांधी यांनी काही दिवसांआधी माफीवीर म्हणत भाजपवर टीका केली होती. भारत जोडो यात्रेत आल्यानंतर सावरकरांचे नाव घेत टीका केल्यानं भाजपने संताप व्यक्त केला आहे. आता सावरकरांचा चित्रपट मोठ्या पडद्यावर उलगडण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राहुल गांधींसाठी मी संपूर्ण थेअटर बुक करतो.

“राहुल गांधींसाठी मी थेअटर बुक करतो”

“महाराष्ट्रातील जनतेनं हा चित्रपट पहावा. स्वातंत्र्यसंग्रामातील खऱ्या हिरोचं आयुष्य या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे.” यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे. चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही तिकीट काढून देणार का? असा प्रश्न केला. त्यावर फडणवीस यांनी मजेशीर उत्तर दिलं, “मी थेअटर बुक करून देतो, फक्त राहुल गांधी यांनी हा चित्रपट पहावा,” असं फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. (Devendra Fadanvis)

हिंदीसह मराठीतही चित्रपट प्रदर्शित

हा चित्रपट आता मराठी भाषेमध्येही प्रदर्शित करण्यात आला आहे. 29 मार्चपासून हा चित्रपट मराठी भाषेतून प्रदर्शित झाला. याची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटासाठी रणदीप हुड्डासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडेनं देखील सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई यांची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार होते. मात्र रणदीप हुड्डा आणि महेश मांजरेकर यांच्यात चित्रपटाला घेऊन काही मतभेद निर्माण झाल्यानं रणदीप हुड्डानं स्वत:च चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

फडणवीस यांच्याकडून रणदीपचं तोंडभरून कौतुक

त्यानंतर फडणवीस यांनी रणदीप हुड्डाच्या अभिनयाचे कौतुक केलं आहे. दिग्दर्शनाचं कौतुक केलं आहे. रणदीप हुड्डानं केलेली भूमिका विलक्षण आहे. “सध्या बिजनेसच्या युगामध्ये अशा प्रकारचा सिनेमा बनवण्याची संकल्पना विलक्षण आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर रणदीप हुड्डा यांनी पुढाकार घेतला. दोघांनीही त्या भूमिकेला सुंदर न्याय दिला”, असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

News Title – Devendra Fadanvis Invite To Rahul Gandhi About Watch Swatantrya Veer Savarkar Movie

महत्त्वाच्या बातम्या

‘या’ 5 लोकांशी ठेवू नका जास्त मैत्री, अन्यथा…

नोव्हेंबरमध्ये राजीनामा अन् पुन्हा बाबरची एन्ट्री, आफ्रिदीची हकालपट्टी; PCB चा मोठा निर्णय!

IPL 2024 मध्ये जलद चेंडू टाकणारा वेगाचा बादशाह; कोण आहे 21 वर्षीय मयंक यादव?

बारामतीतून अखेर अजित पवार गटाचा उमेदवार ठरला, सुनील तटकरेंनी केली घोषणा

“जेव्हा ते धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत होते…”, आर. अश्विन हार्दिकच्या बाजूने मैदानात!