‘या’ 5 लोकांशी ठेवू नका जास्त मैत्री, अन्यथा…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | आचार्य चाणक्य  (Chanakya Niti) यांच्या मार्गदर्शनाने मानवाच्या जीवनाला वेगळं वळण प्राप्त झालं आहे. मानवाने आपल्या जीवनामध्ये कसं राहावं. कोणाशी संगत करावी? किती संगत करावी याबाबत चाणक्यनीती (Chanakya Niti) सांगितली आहे. आचार्य चाणक्य नीतीमुळे मानवाच्या आयुष्यामध्ये सकारात्मक विचारांची भरभराट होताना दिसतेय. आता आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी कोणत्या व्यक्तीशी किती जवळीकता ठेवावी याबाबत माहिती दिली आहे.

5 लोकांशी ठेवू नका जास्त मैत्री

जी व्यक्ती बलवान असते अशा व्यक्तींसोबत जर आपण जवळीकता ठेवली तर त्याचे आपल्याला नुकसान भोगावे लागतील. बलवान व्यक्तीचे आपल्याला गुलाम म्हणून जगावं लागेल. कारण बलवान व्यक्तीला आपण कधीच कोणत्याही गोष्टीला, कामाला नाही म्हणू शकत नाही. बलवान व्यक्तींपासून अधिक दूर राहिलो तरीही आपला तोटा असतो. एखादी आवश्यक वस्तू अथवा एखादं काम मिळवण्यासाठी बलवान व्यक्तीची गरज लागू शकते.  (Chanakya Niti)

रागीट लोक

रागामुळे अनेकदा काय होईल हे सांगता येत नाही. यामुळे आचार्य चाणक्य यांनी रागीट व्यक्तींपासून अधिक लांबही राहू नये आणि अधिक जवळीकताही ठेऊ नये असं सांगितलं आहे. कारण रागीट व्यक्तींपासून लांब राहिलो तर ते कधीही काटा काढू शकतात. तर अधिक जवळीकता केली तरीही ते आपल्याच अंगलंट येऊ शकेल.

स्वार्थी लोक

आचार्य चाणक्य यांनी स्वार्थी लोकांबाबत सांगितलं आहे. चाणक्यनीती सांगते की, जी व्यक्ती स्वार्थी असते अशा लोकांसोबत संबंध ठेवले तर ती व्यक्ती केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी आपल्याकडून काम करून घेईल. लगेचच यांच्यापासून आपण लांब झालो तर त्यांच्यातील स्वार्थीपणा आपल्या लक्षात आला आहे हे त्यांना लगेच समजेल.

गॉसिप

गॉसिप करणारी व्यक्ती ही केवळ स्री, मुलगी असू शकते असं नाहीतर ती व्यक्ती पुरूषही असू शकते. गॉसिप करणाऱ्या व्यक्तींपासून अनेकदा धोका असतो. कारण गॉसिप करणाऱ्या व्यक्तीला अधिक बोलण्याची सवय असते. अशा व्यक्तींपासून दूर राहिलो तरीही ती व्यक्ती आपल्याबद्दल इतर व्यक्तींसोबत गॉसिप करू शकते. गॉसिप करणाऱ्या व्यक्तींसोबत आपण मैत्री केली तरीही दुसऱ्याची गॉसिप आपल्यासोबत ती व्यक्ती शेअर करू शकते.

आचार्य चाणक्य यांनी लोभी व्यक्तींपासून लांब आणि सावध राहण्यासाठी सांगितलं आहे. लोभ असणाऱ्या व्यक्तींना जेवढं मिळेल तेवढं कमीच असते. जर लोभी व्यक्तीशी मैत्री केली तर ते नेहमी स्वत:चा फायदा करून घेतील. तुम्ही मैत्री करून त्याचे कितीही काम केलं तरीही लोभी लोकं आपल्याकडूनच आणखी काम करून घेतील.

News Title – Chanakya Niti Follow Tips About Those People Want To Distance

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीतून अखेर अजित पवार गटाचा उमेदवार ठरला, सुनील तटकरेंनी केली घोषणा

“जेव्हा ते धोनीच्या नेतृत्वाखाली खेळत होते…”, आर. अश्विन हार्दिकच्या बाजूने मैदानात!

शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; पाहा कुणा-कुणाला मिळालं तिकीट?

पुण्याच्या जवळ बनवत होते पॉर्न व्हिडीओ, पोलिसांनी छापा टाकल्यावर पळापळ

मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका बदलली, नव्या भूमिकेमुळे कोणत्या पक्षाला होणार फायदा?