बारामतीतून अखेर अजित पवार गटाचा उमेदवार ठरला, सुनील तटकरेंनी केली घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Loksabha | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची पहिली यादी समोर आली आहे. यामध्ये शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Loksabha) अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीनंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला आहे. सुनील तटकरेंनी याबाबत घोषणा केलीये.

नणंद आणि भावजय आमनेसामने

अनेक दिवसांपासून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे य़ांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. नणंद आणि भावजय अशी लढत बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघात होणार असल्याच्या शक्यतेवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांचं नाव जाहीर केल्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांचं नाव जाहीर केलं आहे.

शरद पवार गटाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये पाच जागांवर उमेदवारांना संधी देण्यात आली. त्यातील दोन बारामती आणि शिरूर जागेकडं सर्वांचं लक्ष होतं. बारामती लोकसभेतून (Baramati Loksabha) सुप्रिया सुळे आणि शिरूरमधून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली. तसेच अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली.

तर वर्ध्यातून अमर काळे यांना संधी देण्यात आली. वर्ध्यातून कराळे गुरूजींना उमेदवारी हवी होती, मात्र त्यांना उमेदवारी देण्यात न आल्यानं कराळे गुरूजींनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दिंडोरीतून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

“अमेठी निसटू शकतो तर बारामती का नाही…?”

अमेठी मतदरासंघ हा काँग्रेस राहुल गांधी यांचा बालेकिल्ला होता. मात्र 2019 मध्ये काँग्रेसला भाजपने पराभूत केलं होतं. भाजप नेत्या स्मृती इराणी यांना अमेठीची उमेदवारी देण्यात आली होती. मग आता बारामती का जिंकू शकत नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. आता चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केली आहे. पक्ष आणि चिन्हही अजित पवार यांच्या बाजूनं असल्यानं सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार अजित पवार यांच्या मदतीने आव्हान देणार असल्याची चर्चा आहे.

News Title – Baramati Loksabha Sunetra Pawar Vs Supriya Sule News update

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; पाहा कुणा-कुणाला मिळालं तिकीट?

पुण्याच्या जवळ बनवत होते पॉर्न व्हिडीओ, पोलिसांनी छापा टाकल्यावर पळापळ

मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका बदलली, नव्या भूमिकेमुळे कोणत्या पक्षाला होणार फायदा?

“मराठ्यांनो, अपक्ष उमेदवार उभे करु नका”, मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं कारण

लोकसभेला कुणाला मतदान करायचं?, मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा