लोकसभेला कुणाला मतदान करायचं?, मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघालं. सर्व नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली. अशात राज्यात देखील अनेक घडामोडी घडताना दिसत आहे.

मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा

मराठा आंदोलनाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरू शकतात अशी शक्यता होती. अशात जरांगे पाटलांनी भूमिका बदलत एक मोठी घोषणा केली. लोकसभेत कुणाला मतदान करायचं? याबाबतही जरांगेंनी मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन केलंय.

मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर त्यांनी लोकसभा निवडणूकीबाबत त्यांची भूमिका मांडली आहे. जरांगे पाटलांनी उमेदवार देणार नसल्याची घोषणा करत माझा कोणालाच पाठिंबा नसल्याचं जाहीर केलं आहे.

“त्यालाच मतदान करा, बाकीचे पाडून टाका”

जो आपल्या बाजूने उभा राहील त्याला मतदान करा, बाकीचे पाडून टाका. तुमच्या आमच्या हट्टापायी जात संपवायची नाही. भावनेचा आहारी जाऊन निवडणुका होत नाहीत. यांना धसकी होती म्हणून यांनी उमेदवार दिला नाही. उद्यापासून बघा कशा उमेदवारी देतात, आपल्या जातीमुळे हे फुल गॅसवर होते, असं जरांगे पाटलांनी म्हटलंय.

मराठ्यांच्या नादी लागायचं नाही. कोणालाही मतदान करा, पण तो सग्या सोयऱ्याच्या बाजूने असला पाहिजे. मी कोणालाही मतदान करणार नसल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत. तसेच राजकारणामुळे जातीचं वाटोळं करायचं नाही, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

आता मराठो मोकळे झालेत. त्यांना टेंशन आलं असेल मराठे नेमके कोणत्या उमेदवाराला पाडणार त्यांना समजणार नाही, असंही जरांगे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

Pune News: लोणावळ्यात एका बंगल्यात 15 तरुण-तरुणी, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक माहिती उघड

धक्कादायक!!! “अजित पवारांनी केलेल्या सर्व्हेत सु्प्रिया सुळे आघाडीवर, इतक्या मतांनी होतील विजयी”

‘मला माहिती नसताना…’; छगन भुजबळ यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

मुख्यमंत्र्यांचं सुद्धा ऐकलं नाही, अखेर ‘त्या’ एका फोनमुळे घेतली माघार!; शिवतारेंचा गौप्यस्फोट

फक्त एका दिवसात थेट हजार रुपयांनी वाढले सोन्याने भाव, जाणून घ्या आजचे दर