पुन्हा निर्णय बदलला!, जरांगे पाटलांची लोकसभा निवडणुकीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil: आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्यासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या महाराष्ट्राने पाहिल्या. सर्वात आधी प्रत्येक गावातून मराठ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून एक अपक्ष उमेदवार उभा करण्याचा निर्णय झाला होता. यावर मनोज जरांगे पाटील आज निर्णय घेणार होते, अखेर लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा बदललली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला पुन्हा एकदा एक नवं आवाहन केलं आहे.  अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे आवाहन केलं आहे. त्यांच्या आवाहनाची आता राज्याच्या राजकीय तसेच सामजिक वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून मराठा समाजाच्या (Maratha Reservation) वतीने एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा आणि सर्व मराठ्यांनी त्या उमेदवारालाच मतदान करावे, असा निर्णय याआधी अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. 30 एप्रिलपर्यंत याबद्दलचा अंतिम निर्णय घ्या आणि आढावा बैठक आयोजित करा. गावोगावच्या मराठ्यांनी यासंदर्भात मला अहवाल द्या, त्यानंतर मी पुढील भूमिका जाहीर करतो, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं.

मराठा समाजाचे अहवाल मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर आता जरांगे पाटील निराश झाल्याचं पहायला मिळत आहे. मला मिळालेल्या अहवालांच्या आधारावर मला अपक्ष उमेदवार देता येणार नाहीत, असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर करुन टाकलं आहे. मात्र हे जाहीर करत असताना कुणाला मतदान करायचं?, याविषयी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं आहे.

मराठा समाजाने काय करायचं, जरांगे पाटील म्हणाले-

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपल्या याआधीच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार देण्याच्या निर्णयावरुन माघार घेतली आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने कुणाला मतदान करायचं?, यासंदर्भात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी याबद्दल सुद्धा भाष्य केलं आहे.

मला प्राप्त झालेल्या अहवालांच्या आधारे अपक्ष उमेदवार ठरवता येणार नाहीत. हा अहवाल अर्धवट आहे, तसेच गावोगावच्या मराठ्यांचे अहवाल आलेले नाहीत. आलेल्या अहवालांमध्ये सुद्धा अनेक चुका आहेत, त्यामुळे अपक्ष उमेदवार देऊन मी समाजाची फसवणूक करणार नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मी मराठा समाजाची हार करणार नाही. त्यामुळं मराठा समाजाला ज्याला पाडायचं असेल त्याला पाडा. तुमच्या बाजूनं जो कोण उभा असेल त्याला निवडून द्या. आता हे मराठ्यांनी ठरवा. लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पडायचं नाही, असं थेट मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर करुन टाकलं आहे.

विधानसभेला निवडणूक लढवणार?

मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Election) माघार घेतली असली तरी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे सुतोवाच केले आहे. सगे सोयरे शब्दाची अमंलबजावणी केली नाही तर विधानसभेची तयारी करा, असं म्हणत त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील विधानसभा ताकदीने लढवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

News Title: Manoj Jarange Patil big announcement about Lok Sabha election

महत्त्वाच्या बातम्या-

Pune News: लोणावळ्यात एका बंगल्यात 15 तरुण-तरुणी, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक माहिती उघड

धक्कादायक!!! “अजित पवारांनी केलेल्या सर्व्हेत सु्प्रिया सुळे आघाडीवर, इतक्या मतांनी होतील विजयी”

‘मला माहिती नसताना…’; छगन भुजबळ यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

मुख्यमंत्र्यांचं सुद्धा ऐकलं नाही, अखेर ‘त्या’ एका फोनमुळे घेतली माघार!; शिवतारेंचा गौप्यस्फोट

फक्त एका दिवसात थेट हजार रुपयांनी वाढले सोन्याने भाव, जाणून घ्या आजचे दर