Pune News | पुण्याजवळील लोणावळ्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोणावळा येथे काही तरुण आणि तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. लोणवळा येथे वेगवेगळ्या राज्यातील तरुण आणि तरुणी एकत्रित आले, येऊन, पाॅर्न व्हिडीओ बनवत असताना पोलिसांना समजलं. लोणवळ्यात हा प्रकार कुठे घडत आहे? याचा शोध घेत पोलिस घटना स्थळी दाखल झाले, आणि तरुण तरुणींना ताब्यात घेतलं.
नेमकं प्रकरण काय आहे?
सोशल मीडियाचा अति प्रमाणात वाढ होत चालला आहे. राज्यातील तरुण आणि तरुणी सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी तरुण तरुणी कोणत्याही थराला जाऊ शकतात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार, समोर आला आहे. (Pune News) लोणावळा येथे 15 तरुण आणि तरुणी एकत्रीत येऊन पार्न व्हिडीओ शूट करत होते.
लोणावळ्यातील एका व्हील्यामध्ये (Pune News) हा प्रकार घडत होता. पोलिसांना याबदलची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 15 जणांची टोळ्यांना ताब्यात घेतलं. समोर आलेल्या माहितीनूसार, वेगवेगळ्या अश्लील ओ.टी.टी प्लॅटफॉर्मसाठी काही तरुण आणि तरुणी पॉर्न व्हिडिओ तयार करत होते.
पाॅर्न व्हिडीओ करणे गुन्हा-
कायद्यानूसार भारतात पाॅर्न व्हि़डीओ करणे गुन्हा आहे. एवढंच नाही तर, भारतात पार्न व्हिडीओ शूट करण्यात देखील बंदी आहे. मात्र, असं असताना देखील राज्यातील काही तरुण आणि तरुणी एकत्रीत येऊन ‘नको ते उद्योग ‘ करत ‘ नाही तसले’ व्हिडीओ शूट करत होते. पोलिसांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितलं की, वेगवेगळ्या राज्यांतून काही तरुण आणि तरुणी एकत्र येऊन, पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. या वेळी काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आणि त्यांनी घटनास्थळी छापा टाकला.
पाच तरुणींचा समावेश-
ताब्यात घेतलेल्या 15 जणांच्या टोळीमध्ये पाच तरुणींचा समावेश होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावरून पॉर्न व्हिडिओ शूट करण्यासाठी लागणारे कॅमेरे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याचं म्हटलं आहे.
News Title : pune news porn videos maker arrested in lonavala
महत्त्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्र्यांचं सुद्धा ऐकलं नाही, अखेर ‘त्या’ एका फोनमुळे घेतली माघार!; शिवतारेंचा गौप्यस्फोट
फक्त एका दिवसात थेट हजार रुपयांनी वाढले सोन्याने भाव, जाणून घ्या आजचे दर
आनंदाची बातमी! बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल ‘इतक्या’ पदांची भरती
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नवी यादी जाहीर, 40 नावांचा समावेश