R. Ashwin | आयपीएल 2024 अनेक कारणांनी चर्चेत आली आहे. खासकरून यंदाची आयपीएल ही मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदावरून चर्चेत आली. ज्या पद्धतीनं राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटात उभी फूट पडली. त्याचप्रकारे हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदाची धुरा दिल्यापासून रोहित शर्माचे चाहते एका बाजूला आणि मुंबई इंडियन्स संघाचे चाहते एका बाजूला अशी चाहत्यांमध्ये फूट पडली आहे.
काही दिवसांपासून रोहित शर्माचे चाहते पांड्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. पाच वेळा रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये विजेतेपद मिळालं होतं. मात्र आता पांड्याच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत आहेत. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पांड्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हार्दिक पांड्याला म्हणावी अशी कामगिरी करता आली नाही. यामुळे पांड्याला ट्रोलर्सला सामोरं जावं लागत आहे. मात्र आता टीम इंडियाचा फिरकीपटू गोलंदाज आर. अश्विनला (R. Ashwin) हार्दिक पांड्याची दया आली आहे. त्याने एका युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नेटकऱ्यांचे कान धरले आहेत.
काय म्हणाला आर. अश्विन?
टीम इंडियाचा फिरकीपटू गोलंदाज आणि आयपीएल संघातील राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू आर. अश्विनला (R. Ashwin) पांड्याची दया आली आहे. यावर अश्विनने (R. Ashwin) ट्रोलर्सना सुनावलं आहे. त्याने आपल्या टीम इंडियातील सिनिअर आणि ज्युनिअर खेळाडूंचं उदाहरण देत नेटकऱ्यांना सुनावलं आहे. तो म्हणाला की, “तुम्हाला एखादा खेळाडू आवडत नसेल, त्याचा राग येत असेल तसेच त्याचा तिरस्कार येत असेल तर एखाद्या संघानं त्यावर स्पष्टीकरण का द्यावं?”, असा सवाल करण्यात आला. “एखादा सिनिअर खेळाडू हा ज्युनिअर खेळाडूच्या नेतृत्वामध्ये खेळतोय ही पहिली वेळ नाही. पण आपण असं दाखवत आहात की असं याआधी कधीही झालं नाही.”
“एकेकाळी हे सर्व एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले”
“सचिन तेंडुलकरही सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. सचिन तेंडुलकर राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. तर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली हे देखील अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वात खेळले आहेत. एकेकाळी हे सर्व एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. ते खेळणारे खेळाडू दिग्गज खेळाडू होते,” असं म्हणत आर. अश्विनने (R. Ashwin) ट्रोलर्सना सुनावले आहे.
#RAshwin expressed amazement at Hardik Pandya’s booing in India, stating that the ‘fan wars’ culture is turning ugly.
📸: IPL/BCCI
Content : CricTracker pic.twitter.com/QF4i6xcz4o
— Balaji Duraisamy (@balajidtweets) March 30, 2024
यंदाची आयपीएल सुरू होण्याआधी मॅनेजमेंट टीमने अनेक वेगवेगळे निर्णय घेतले. सुरूवातीला हार्दिक पांड्याला गुजरातकडून ट्रेड करण्यात आलं आहे. त्यानंतर पांड्याला मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार करण्यात आलं. यामुळे रोहित शर्माचे चाहते संतापले. हार्दिक पांड्या रोहित शर्माच्या चाहत्यांच्या कचाट्यात सापडला. रोहितचे चाहते हे पांड्याचे ट्रोलर्स झाले.
पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये पांड्याच्या नेतृत्वामध्ये संघ म्हणावी अशी कामगिरी करू शकला नाही. दोन्ही सामन्यामध्ये पराभवाचा सामना मुंबई इंडियन्स संघाला करावा लागल्याने त्याचं खापर पांड्यावर फोडण्यात आलं.
News title – R. Ashwin Aggressive On Hardik Pandya’s Trollers
महत्त्वाच्या बातम्या
मुख्यमंत्र्यांचं सुद्धा ऐकलं नाही, अखेर ‘त्या’ एका फोनमुळे घेतली माघार!; शिवतारेंचा गौप्यस्फोट
फक्त एका दिवसात थेट हजार रुपयांनी वाढले सोन्याने भाव, जाणून घ्या आजचे दर
आनंदाची बातमी! बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल ‘इतक्या’ पदांची भरती
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नवी यादी जाहीर, 40 नावांचा समावेश