Sharad Pawar NCP List | आगामी लोकसभा निवडणुकीचे घोडेमैदान फार लांब राहिले नाही. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या याद्या आता बाहेर येऊ लागल्या आहेत. अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून गुंता होता. तो गुंता आता सुटल्याचं दिसत आहे. यामुळे महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी (Sharad Pawar NCP List) जाहीर केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघामधून शरद पवार यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे लढणार असल्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरीतून भास्कर भगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. वर्ध्यातील जागेवर अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. (Sharad Pawar NCP List)
शरद पवार गटाच्या पहिल्या यादीमध्ये (Sharad Pawar NCP List) एकूण पाच उमेदवारांना पाच जागेवर संधी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या लोकसभा उमेदवारीच्या निश्चितीनंतर अहमदनगरमधून निलेश लंके आणि वर्ध्यातून अमर काळे यांना संधी देण्यात आली. वर्ध्यातून कराळे गुरूजींना उमेदवारी हवी होती. मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. तसेच कराळे गुरूजी हे शरद पवार यांच्या तीन वेळा भेटीला गेले होते. ही पहिली यादी समोर आली असून आणखी एक यादी समोर येणार असल्याचं शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितलं आहे. (Sharad Pawar NCP List)
साताऱ्याच्या जागेवर सस्पेन्स
श्रीनिवास पाटील यांनी यंदा साताऱ्याची जागा लढण्यासाठी नकार दिला आहे. यामुळे अनेकांचं लक्ष साताऱ्याच्या जागेकडं लागलं आहे. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना जागा देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. जर ही जागा काँग्रेसला दिली तर शरद पवार यांचा पक्ष कोणती जागा घेणार याबाबतची माहिती अद्यापही समोर आली नाही. याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.
कराळे गुरूजींच्या पदरी निराशा
वर्ध्याच्या जागेवर कराळे गुरूजींनी दावा केला होता. मात्र ती जागा आता अमर काळे यांना देण्यात आल्याने कराळे गुरूजींच्या पदरी निराशा आली आहे. तसेच कराळे गुरूजी यांनी कालच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यांना उमेदवारी न दिल्याने ते नाराज आहेत.
त्यांनी पक्षप्रवेशानंतर शरद पवार यांची अनेकदा भेट घेतली होती. वर्ध्याची जागा का दिली पाहिजे हे देखील कराळे गुरूजी यांनी सांगितलं होतं. मात्र शरद पवार गटाने वर्ध्यातून कराळे गुरूजींचा पत्ता कट केला आहे.
विजयाचा निर्धार पक्का करून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्तासमोर रणशिंग फुंकण्यासाठी तुतारी सज्ज आहे!… pic.twitter.com/oiXVgTvXP1
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 30, 2024
News title – Sharad Pawar NCP List
महत्त्वाच्या बातम्या
लोकसभेला कुणाला मतदान करायचं?, मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा
पुन्हा निर्णय बदलला!, जरांगे पाटलांची लोकसभा निवडणुकीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा
Pune News: लोणावळ्यात एका बंगल्यात 15 तरुण-तरुणी, पोलिसांनी छापा टाकताच धक्कादायक माहिती उघड
धक्कादायक!!! “अजित पवारांनी केलेल्या सर्व्हेत सु्प्रिया सुळे आघाडीवर, इतक्या मतांनी होतील विजयी”
‘मला माहिती नसताना…’; छगन भुजबळ यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!